जिल्ह्यात २६ संवेदनशील मतदान केंदे्र
By Admin | Updated: October 3, 2014 00:38 IST2014-10-03T00:25:00+5:302014-10-03T00:38:07+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांची निवड संवेदनशील केंद्र म्हणून करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २६ संवेदनशील मतदान केंदे्र
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांची निवड संवेदनशील केंद्र म्हणून करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.
१५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. पोलीस दलाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद आयुक्तालयाच्या हद्दीत १८ आणि उर्वरित जिल्ह्यात ८, अशी एकूण २६ मतदान केंदे्र संवेदनशील म्हणून निवडण्यात आली आहेत.