२६९ अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST2017-09-12T00:49:30+5:302017-09-12T00:49:30+5:30

तालुक्यात वस्ती तेथे अंगणवाडी या तत्त्वानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्पअंतर्गत चालवल्या जाणाºया एकूण ४१७ अंगणवाड्या आहेत. पैकी फक्त १४८ अंगणवाड्यांना शासनाची इमारत आहे़ तर तालुक्यात २६९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही़

26 9 Lack of buildings to the anganwadis | २६९ अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

२६९ अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

दत्तात्रय कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : तालुक्यात वस्ती तेथे अंगणवाडी या तत्त्वानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्पअंतर्गत चालवल्या जाणाºया एकूण ४१७ अंगणवाड्या आहेत. पैकी फक्त १४८ अंगणवाड्यांना शासनाची इमारत आहे़ तर तालुक्यात २६९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही़ यामुळे चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अगोदरच तोकडा पगार, त्यात अशा अडचणी़ एवढेच नाहीतर शासनाच्या राष्ट्रीय कामात या अंगणवाडीताई नेहमीच अग्रेसर असतात. जनगणना, कुपोषित बालकांचा सर्वे, पोलिओ मोहीम, मतदान बी.एल.ओ. व मतदान दिवशी दिवसभर काम याबरोबरच आरोग्य विभागाच्या मदतीने कुपोषित बालकांना एक महिना शिबिरे भरवून बालकांना कुपोषणमुक्त करणे अशी विविध कामे करावी लागतात. तरीही पगार कमीच.
तालुक्यात १३५ महसुली गावे, वाडीतांड्यासह आहेत. यासाठी ४१७ अंगणवाडी आहेत तर अंगणवाडी सेविका २८३ व अंगणवाडी मदतनीस २८३, तर मिनी अंगणवाडीसेविका १३४ एवढे पदे भरण्यात आले. तर सध्या ० ते ६ वयोगटाची अंगणवाडीतील विद्यार्थीसंख्या २८ हजार आहे. तर यात तीव्रता कमी असलेली संख्या २९८ तर मध्यम विद्यार्थीसंख्या ७०० ते ८०० आहे.
शासनाची इमारत असलेल्या अंगणवाड्यांना रंगरंगोटी नाही. अस्वच्छ परिसर, दुर्गंधी पसरलेली, यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर यांना अनेक समस्यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सामोरे जावे लागते. भौतिक सुविधा नाहीत़ यामुळे पालकही आता अंगणवाडीत बालकांना न पाठवता आता तो पैसे भरुन शहरात किंवा इंग्रजी शाळेत पाठवित आहे़ यामुळेच पुढे मराठी शळेला मुले मिळेनात. परिणामी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना शेवटची घरघर लागली आहे.

Web Title: 26 9 Lack of buildings to the anganwadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.