शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:08 IST

३०७ कोटींचे भूसंपादन आणि २०० कोटी रस्त्यासाठी

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा योजनेची २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी ३४ कि.मी. पर्यंत छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याखाली दबली आहे. त्यामुळे विद्यमान चौपदरी रस्त्याची १० मीटर जागा ७००, ९००, १२०० व नवीन २५०० मि.मी.च्या जलवाहिनीसाठी सोडावी लागणार आहे. रस्त्याची एक बाजू वाढविण्यासाठी ३०७ कोटींतून भूसंपादन करण्याचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात येईल, तर २०० कोटी रुपये नवीन रस्ता करण्यासाठी लागण्याचा अंदाज आहे.

असा ५०७ कोटींचा भुर्दंड नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेल्या हलगर्जीपणामुळे बसणार आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्याच्या खाली शहर पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी आल्यामुळे नव्याने एक लेन वाढवावी लागणार आहे. २७४० कोटींच्या शहर पाणीपुरवठा योजनेतून शहराला पाणीपुरवठा कधी होणार, हे स्पष्ट नाही. त्यातच ३४ कि.मी. जलवाहिनीवरून रस्त्याचे काम झाल्यानंतर एमजीपी, एनएचएआयचे डोळे उघडले. या तांत्रिक घोळाचा सर्व्हे झाला. डोळेझाक करण्यास दोषी कोण, यावरून एमजीपी, एनएचएआयमध्ये टोलवाटोलवी कायम आहे.

२७० कोटींत चौपदरीकरणएनएचएआयने छत्रपती संभाजीनगर ऑफ पैठण ते रस्त्याचे चौपदरीकरण २७० कोटी रुपयांत केले. ४५ कि.मी. मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरू केले. अजूनही त्या मार्गाचे काम पूर्ण झाले नसून सात कि.मी.चे कमी करून कंत्राटदाराचे १८ कोटींचे वाचविले. डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द केले. सेठी या कंत्राटदाराकडील ५ व मेहरा या कंत्राटदाराकडील दोन कि.मी.चे काम रद्द करीत एनएचएआयने काम थांबविले. शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे सात कि.मी. अंतरात रस्त्याच्या कामाला वाव नव्हता, असा एनएचएआयचा दावा आहे.

शासनाकडील पाठपुराव्यावर भवितव्यनवीन भूसंपादन प्रस्तावात ढोरकीन, बिडकीन, गेवराई तांडा या गावातून बायपास प्रस्तावित आहे. भू संपादनासाठी राज्य शासनाकडून ३०७, तर केंद्राला २०० कोटी आणावे लागतील. शासनाकडे कसा पाठपुरावा होणार, त्यावर नवीन रस्ता व भूसंपादनाचे भवितव्य अवलंबून आहे. जलवाहिनीचे काम कधी पूर्ण होणार, भूसंपादनासह रस्ता बांधणीला निधी कधी मिळणार, विद्यमान रस्त्याखालून जलवाहिनी गेली आहे. त्या रस्त्यावरून जड वाहतूक जाईल की नाही, यासारखे तांत्रिक प्रश्न समोर आहेत.

 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी