एमपीएससी परीक्षेला अडीच हजार उमेदवार
By Admin | Updated: February 2, 2015 01:11 IST2015-02-02T01:01:57+5:302015-02-02T01:11:56+5:30
जालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक २०१४ ची पूर्वपरीक्षा रविवारी शहरात अडीच हजार उमेदवारांनी दिली.

एमपीएससी परीक्षेला अडीच हजार उमेदवार
जालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक २०१४ ची पूर्वपरीक्षा रविवारी शहरात अडीच हजार उमेदवारांनी दिली. या परीक्षेसाठी राज्यातील अन्य काही जिल्ह्यातील उमेदवारांचा सहभाग होता.
शहरात १० केंद्रांवर ही परीक्षा सकाळी १० ते १ या वेळेत पार पडली. या केंद्रांमध्ये सरस्वती भुवन हायस्कूल, मत्स्योदरी महाविद्यालय, सेंटमेरीज हायस्कूल, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सीटीएमके गुजराती विद्यालय, एम.एस. जैन विद्यालय, जेईएस महाविद्यालय, दानकुंवर विद्यालय, रेयॉन इंटरनॅशनल यांचा समावेश होता. या परीक्षेसाठी एकूण ३१७७ उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी २५७० उमेदवारांनी परीक्षा दिली, तर उर्वरीत ६०७ गैरहजर होते. परीक्षेसाठी १० केंद्रप्रमुख, दोन समन्वय अधिकारी व इतर अशा ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाने केली होती. जिल्हा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)