रक्षाबंधनाच्या २५० गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:54 IST2017-08-06T16:50:33+5:302017-08-06T16:54:37+5:30

महावीर भवन येथे आयोजित सामुहिक रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे २५० बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधली हा सोहळा पाहण्यासाठी जैन समाजबांधवांनी गर्दी केली होती. 

250 bales of Rakshabandhan | रक्षाबंधनाच्या २५० गाठी

रक्षाबंधनाच्या २५० गाठी

ठळक मुद्देया सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे २५० बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधलीतारामती बाफना अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  ‘गुरुदेव आम्हे दया करो’ हे गीत सादर करुन सर्वांची मने जिंक़ली.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ६ :  ‘आयुष्यात माझ्याकडून तुझ्या बदल कटू शब्द निघाले असतील, तर मला माफ कर,’ असे म्हणत बहिणींनी आपल्या भाऊरायाला राखी बांधली. ‘ कितीही संकट आले तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे मी उभे राहिल व आयुष्यभर तुझे संरक्षण करील’ असे वचन भावाने आपल्या लाडक्या बहिणीला दिले. या आनंदात बहिणीनेही बंधुला मिठाईचा घास भरविला. हा प्रसंग कोणत्या घरातील नव्हता तर महावीर भवन येथे आयोजित सामुहिक रक्षाबंधन सोहळ्यातील होता. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे २५० बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधली हा सोहळा पाहण्यासाठी जैन समाजबांधवांनी गर्दी केली होती. 

वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने रविवारी ६ रोजी सामुहिक रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मपीठावर विवेकमुनीजी म.सा. आदिठाणा ५ यांची उपस्थिती होती. प्रारंभी, जास्तीत जास्त तपआराधना करण्याचा संकल्प करणा-या महिलांनी संकल्प रुपी राखी विवेकमुनीजी म.सा. गौरवमुनीजी म.सा. संभवमुनीजी म.सा., सौरभमुनीजी म.सा, प्रणवमुनीजी म.सा. यांना दिली. यानंतर अवघ्या ५ वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंतचे २५० भाऊराया चार रांगेत बसले. त्यांच्या समोर बहिणी बसल्या. प्रथम या बहिणींनी भाऊरायाला टिळा लावला यानंतर त्यांच्या हातात राखी बांधली. भाऊरायाने बहिणीला भेटवस्तू दिली. यानंतर मिठाईने बहिणींनी मिठाईने भावाचे तोंड गोड केले. प्रारंभी, गौरवमुनीजी म.सा. यांनी एका भाऊ-बहिणीची कथा सांगितली. त्यावेळीस सर्व भाविक भारावून गेले होते. यावेळी थाळी सजावट स्पर्धाही घेण्यात आली. धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व गुरूमिश्री युवा मंडळ व प्रभा कन्या मंडळाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ताराचंद बाफना यांनी तर अध्यक्ष प्रकाश बाफना यांनी आभार मानले. 

अंध मुलांनी मनेजिंकली 
महावीर भवन येथील रक्षाबंधन सोहळ्यात तारामती बाफना अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  ‘गुरुदेव आम्हे दया करो’ हे गीत सादर करुन सर्वांची मने जिंक़ली.  यानंतर उपस्थिती मुलींनी व महिलांनी या मुलांना राखीबांधली. यामुळे भारावून गेलेल्या मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

Web Title: 250 bales of Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.