बिलोली सीमावर्ती भागात वाळूचे २५ ट्रक पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:24 IST2017-09-22T00:24:13+5:302017-09-22T00:24:13+5:30

सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून नियमबाह्य वाळू वाहतूक करणाºया २५ ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान कारवाई केली़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविले असून ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला़

25 trucks of sand have been seized in Biloli border area | बिलोली सीमावर्ती भागात वाळूचे २५ ट्रक पकडले

बिलोली सीमावर्ती भागात वाळूचे २५ ट्रक पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून नियमबाह्य वाळू वाहतूक करणाºया २५ ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान कारवाई केली़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविले असून ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला़
सीमावर्ती गोळेगावच्या खाजगी वाळू पट्टयाची वाळू उपशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे़ मध्यंतरी पाऊस झाल्याने १५ दिवसांपासून उपसा बंद होता़ चार-पाच दिवसापूर्वी पुन्हा उपसा सुरू झाला़ दरम्यान, महसूलचे नियम व अटींची पायमल्ली करून मध्यरात्री जेसीबीद्वारे उपसा करून वाळूची वाहतूक सुरू झाली होती़ याबाबत माहिती मिळताच सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान नदीपात्रात धडकले़ तेव्हा ठेकेदार एका चारचाकी वाहनात बसून वाळूने भरलेले ट्रक लंपास करीत होता़ यावेळी १० ट्रक जप्त करण्यात आले़ दुसºया पथकाने देगलूरमार्गे कर्नाटककडे रवाना झालेले १५ ट्रक पाठलाग करून पकडण्यात आले़ असे एकूण २५ ट्रक जप्त करण्यात आले़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले़ सर्व ट्रक व चालक यांना ताब्यात घेण्यात आले़ ठेकेदारावरही गुन्हा नोंदवण्यात आला़
पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ओमकांत चिंचोलकर, फौजदार बी़ एम़ तोडकर यांनी ही कारवाई केली़

Web Title: 25 trucks of sand have been seized in Biloli border area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.