अडीच लाखांची हळद चोरीस; गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 19, 2016 23:20 IST2016-06-19T23:17:12+5:302016-06-19T23:20:39+5:30

हिंगोली : शहराजवळील लिंबाळा मक्ता शिवारात एमआयडीसीमधील गोदाम फोडून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीचे हळदीचे ६० कट्टे चोरून नेल्याचा प्रकार १४ जून रोजी दुपारी २.३० वाजता उघडकीस आला.

2.5 million turmeric stolen; Filed the complaint | अडीच लाखांची हळद चोरीस; गुन्हा दाखल

अडीच लाखांची हळद चोरीस; गुन्हा दाखल

हिंगोली : शहराजवळील लिंबाळा मक्ता शिवारात एमआयडीसीमधील गोदाम फोडून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीचे हळदीचे ६० कट्टे चोरून नेल्याचा प्रकार १४ जून रोजी दुपारी २.३० वाजता उघडकीस आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अमित ओमप्रकाश हेडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. १४ जून रोजी दुपारी ही चोरी उघडकीस आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या गोदामाचे पत्रे काढून चोरटे आत शिरले व त्यांनी अडीच लाख रूपये किमतीचे हळदीचे ६० कट्टे चोरून नेल्याचेही त्यात म्हटले आहे. ुअधिक तपास जमादार गंगाधर मस्के पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 2.5 million turmeric stolen; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.