अडीच लाखांचा गैरव्यवहार
By Admin | Updated: June 3, 2014 00:46 IST2014-06-03T00:28:08+5:302014-06-03T00:46:54+5:30
उस्मानाबाद : बाराव्या व तेराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या निधीत अफरातफर करून २ लाख ४९ हजार ३५० रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार दाऊतपूर येथे उघडकीस आला आहे.

अडीच लाखांचा गैरव्यवहार
उस्मानाबाद : बाराव्या व तेराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या निधीत अफरातफर करून २ लाख ४९ हजार ३५० रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गटविकास अधिकारी, सरपंचासह चौघांविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दारूतपूर येथे बाराव्या व तेराव्या वित्त आयोगातून सन २००९ ते आॅक्टोबर २०१३ या कालावधीत विविध विकास कामे करण्यात आली होती. परंतु, यात सरपंच मालन दिलीप सोलनकर, ग्रामसेवक दीप्ती दिवाकर कुलकर्णी, ग्रामसेवक गणेश नामदेव देशमुख व गटविकास अधिकारी भागवत रामभाऊ ढवळशंख यांनी कामासाठी मंजूर झालेल्या निधीत गैरव्यवहार करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कामाचे मूल्यांकन जास्तीचे दाखविले. तसेच यातून २ लाख ४९ हजार ३५० रूपयांचा गैरव्यवहार केला, अशी फिर्याद बाळासाहेब सुभेदार यांनी उस्मानाबाद येथील न्यायालयात दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सदरील चौघांविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि काळे करीत आहेत. मुलीस पळविले उस्मानाबाद : सलगरा दिवटी येथील मोईन खय्युम पटेल याने एका १६ वर्षाच्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास पळवून नेल्याची घटना घडली. नातेवाईकांनी तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही़ या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पटेल याच्याविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा अधिक तपास सपोनि पाटील हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)