काळेश्वर मंदिरात दानपेट्या फोडून अडीच लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:33 IST2017-09-05T00:33:07+5:302017-09-05T00:33:07+5:30
विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वर मंदिराच्या गाभाºयातील तब्बल तीन दानपेट्या फोडून चार चोरट्यांनी सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांची रोकड लांबविली़ ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़

काळेश्वर मंदिरात दानपेट्या फोडून अडीच लाख लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड : विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वर मंदिराच्या गाभाºयातील तब्बल तीन दानपेट्या फोडून चार चोरट्यांनी सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांची रोकड लांबविली़ ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाला कापड बांधलेल्या अज्ञात चार चोरट्यांनी चार सप्टेंबर रोजी पहाटे अडीच ते साडेतीन वाजण्याचे सुमारास विष्णूपुरी भागातील श्री काळेश्वर मंदिराच्या उत्तर बाजूकडील चॅनल गेटचे कुलूप तोडून आत मंदिरात प्रवेश मिळविला. त्याचेवळी, चोरट्यांनी संधीचा फायदा घेत श्री काळेश्वर मंदिराच्या गाभाºयातील व भिंतीलगत असलेल्या तीन दानपेट्यांचे कुलूप तोडून दोन ते अडीच लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सकाळी श्री काळेश्वर मंदिरातील पुजाºयांच्या निदर्शनास आली़ पुजाºयांनी या घटनेची माहीती काळेश्वर मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांसह नांदेड ग्रामीण पोलिसांना कळविली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्यासह नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, पोउपनि. कल्याण नेहरकर, विशेष गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन मोरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी मंदिराचे पुजारी शिवलिंग नारायण धनमने यांनी दिलेल्या तक्रारीआधारे ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला़