बायपासच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद

By Admin | Updated: September 8, 2014 00:57 IST2014-09-08T00:05:22+5:302014-09-08T00:57:02+5:30

बीड : जिल्ह्याच्या व शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बीड बायपासचा आहे. हे काम मार्गी लावण्याचे काम पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झाले असून नुकतेच या कामासाठी

25 crores for the purpose of bypass | बायपासच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद

बायपासच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद


बीड : जिल्ह्याच्या व शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बीड बायपासचा आहे. हे काम मार्गी लावण्याचे काम पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झाले असून नुकतेच या कामासाठी २५ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद पालकमंत्री क्षीरसागर यांनी केली असून बायपासचे काम तात्काळ करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
बीड शहरातून जाणाऱ्या २११ राष्ट्रीय महामार्गावर अती जलदगतीने जाणारी वाहने यामुळे अनेकवेळा अपघात घडतात. हे अपघात टाळण्याच्या दृष्टीकोणातून जयदत्त क्षीरसागर यांनी बायपाससाठभ सतत प्रयत्न केलेले आहेत. दिल्ली- बँगलोर अशी वाहतूक करणाऱ्या या रस्त्यावर बीड शहराच्या बाजूने बायपास काढण्यात येत आहे.
या कामासाठी लागणाऱ्या २५ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झाली आहे. बायपास बरोबरच शहरातील दुभाजकांचे काम प्रगतीपथावर आहे. जालना रोड, साठे चौक, बसस्थानक, शिवाजी चौक, बार्शी नाका आदी ठिकाणी दुभाजक उभारण्याचे काम सुरू आहे. शहराच्या सौंदरीकरणासाठी दुभाजकांतर्गत वेगवेगळ्या फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 25 crores for the purpose of bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.