जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी मंजूर
By Admin | Updated: August 27, 2014 23:37 IST2014-08-27T23:23:48+5:302014-08-27T23:37:34+5:30
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी कामांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ५ कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे़

जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी मंजूर
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी कामांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ५ कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे़
परभणी येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करणे आवश्यक होते़ या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी नोंदविण्यात आल्यानंतर शासनाने एकूण ५ कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांच्या मुख्य इमारत दुुरुस्ती व रंगरंगोटीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ मिळालेल्या निधीमध्ये प्रशासकीय इमारत बांधकाम, भांडारगृह व कॉन्फरन्स हॉल यासाठी ३ कोटी ६२ लाख ३८ हजार तर मनोरुग्ण कक्ष, बाल रोग कक्ष व कैदी कक्ष यासाठी प्रत्येकी ५६ लाख ७४ हजार रुपयांप्रमाणे १ कोटी ७० लाख २२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत़
याशिवाय रुग्णालयीन रंगरंगोटी व किरकोळ डागडुजीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ निधी मंजुरीचा आदेश २७ आॅगस्ट रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव पी़एम़ टाकटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)