शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

२४०० एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:24 IST

महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपादरम्यान गैरहजर राहणा-या जवळपास २४०० कर्मचाºयांचे वेतन कपातीचे आदेश महामंडळ प्रशासनाने गुरुवारी दिले आहेत.

ठळक मुद्देआदेश : संपादरम्यान गैरहजर राहिल्याने महामंडळाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपादरम्यान गैरहजर राहणा-या जवळपास २४०० कर्मचाºयांचे वेतन कपातीचे आदेश महामंडळ प्रशासनाने गुरुवारी दिले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशांतर्गत डिझेलचे दर वर्षभरात ११ ते १२ रुपयांनी वाढले आहेत. याचा परिवहन महामंडळाच्या तिजोरीवर परिणाम झाला. त्यातच महामंडळाने कर्मचाºयांना नुकतीच वेतनवाढ जाहीर केली. मात्र, ही वेतनवाढ समाधानकारक नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटना आणि इंटक ८ जूनपासून बेमुदत संपावर गेली होती. याचा पहिल्या दिवशी परिणाम जाणवला नाही. मात्र, दुसºया दिवशी वाहतूक सेवा पूर्णत: ठप्प होती. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आठही आगार मिळून जवळपास ७५० आणि दुसºया दिवशी १७५० कर्मचारी गैरहजर होते. या संपादरम्यान गैरहजर राहणाºया कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने गुरुवारी काढले आहेत. या पत्रानुसार ‘ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार त्या दिवसाचे वेतन देण्यात येऊ नये, याव्यतिरिक्त प्रत्येक कामगाराच्या वेतनातून ८ दिवसांची वेतन कपात करण्यात यावी, म्हणजेच १ दिवस गैरहजर राहिल्यास ९ दिवस आणि दोन दिवस गैरहजर राहिल्यास दहा दिवसांचे वेतन कपात करण्यात यावे, संप कालावधीत १-२ दिवस गैरहजेरीपोटी करावयाच्या वेतन कपातीची रक्कम जुलै २०१८ च्या पगारातून, तर उर्वरित ८ दिवसांच्या वेतनाची कपात ही आॅगस्टपासून प्रत्येक महिन्यास एक दिवस करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारीStrikeसंप