२४ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:37 IST2017-08-24T00:37:32+5:302017-08-24T00:37:32+5:30
हैदराबाद येथून गुटखा घेऊन येणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने भायेगाव फाट्याजवळ पकडला़ या ट्रकमध्ये २४ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा होता़

२४ लाखांचा गुटखा पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: हैदराबाद येथून गुटखा घेऊन येणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने भायेगाव फाट्याजवळ पकडला़ या ट्रकमध्ये २४ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा होता़
हैदराबाद येथून गुटखा भरुन निघालेला ट्रक वाशिमकडे जात होता़ या रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक होते़ भरधाव वेगाने जाणाºया ट्रकचा स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी पाठलाग करुन ट्रक अडविला़ ट्रकमध्ये सितार मावा व डायमंड कंपनीच्या गुटख्याचे एकूण ५५ डाग होते़ याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात नोंद करण्यात आली़