शहरात २४ दिवसांत ११ घरे, १८ दुकाने फोडली
By | Updated: November 27, 2020 04:01 IST2020-11-27T04:01:59+5:302020-11-27T04:01:59+5:30
औरंगाबाद : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांसाठी औरंगाबाद शहर आणि परिसरातील वातावरण अनुकूल बनत आहे. शहरात वाहनचोरी आणि घरफोड्या करणारे चोरटे ...

शहरात २४ दिवसांत ११ घरे, १८ दुकाने फोडली
औरंगाबाद : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांसाठी औरंगाबाद शहर आणि परिसरातील वातावरण अनुकूल बनत आहे. शहरात वाहनचोरी आणि घरफोड्या करणारे चोरटे बिनधास्तपणे वावरत आहेत. नोव्हेंबर महिन्यातील २४ दिवसांत (दि. २४ नोव्हेंबरपर्यंत) चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतील ११ दुकाने, तसेच १८ घरे फोडली असून, ६२ दुचाकी लंपास केल्या. एवढ्यावरच चोर थांबले नाहीत, तर त्यांनी दोन रिक्षा, एक कार आणि टेम्पोसुद्धा पळविल्याचे समोर आले. मोठी यंत्रणा कार्यरत असताना घरफोडी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस चोरट्यांना का आवर घालत नाहीत, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
नोव्हेंबर महिन्यात विविध ठाण्यांत दाखल गुन्ह्यानुसार पुढीलप्रमाणे झाल्या चोऱ्या, घरफोड्या.
१ नोव्हेंबर
- पैठणगेट येथील दुकान चोरट्यांनी फोडले.
२ नोव्हेंबर
- सिडको पोलीस कॉलनीतील फौजदाराचे घर फोडले
४ नोव्हेंबर
- भोईवाड्यात एका घरात मोबाईल चोरी
१ नोव्हेंबर रोजी बायपासवर कन्सल्टन्सी कार्यालय फोडून वाहनांच्या बॅटऱ्या लंपास केल्या.
१ नोव्हेंबर रात्री मदरशातील दानपेटी चोरी झाली.
६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील चंदन झाड तोडून नेले.
५ नोव्हेंबर
पुंडलिकनगर परिसरातील कापड दुकान फोडले.
७ नोव्हेंबर
सातारा परिसरात महिलेचे भरदिवसा घर फोडले.
९ नोव्हेंबर
भडकलगेट येथे उभा टेम्पो चोरीला गेला.
१ नोव्हेंबर
बेरीबाग, हर्सूल येथील घर फोडले
११ नोव्हेंबर
रांजणगाव येथील लाखोंची रोकड असलेले एटीएम मशीन चोरून नेण्याचा चोरट्यांचा धाडसी प्रयत्न.
११ नोव्हेंबर
बनेवाडी येथील घर फोडले
१९ नोव्हेंबर
चेतनानगर येथील दुकान फोडले
१५ नोव्हेंबर
उस्मानपुरा भागातील कापड दुकान फोडले
१४ नोव्हेंबर
दिल्लीगेट रस्त्यावरील फर्निचरची चोरी
१५ नोव्हेंबर
पंचशीलनगर येथील घर फोडले
१५ नोव्हेंबर
छत्रपतीनगर कारचोरी
५ नोव्हेंबर
मोतीकारंजा उघड्या घरात चोरी
११ नोव्हेंबर
पुंडलिकनगरात घरफोडी
१७ नोव्हेंबर
एन-४ सिडको येथे घर फोडले
१० नोव्हेंबर
देवानगरीत घर फोडले
१२ नोव्हेंबर
वाळूज एमआयडीसीमधील कंपनीत चोरी
११ नोव्हेंबर
हर्सूल परिसरातील साईनगरमध्ये घर फोडले
१८ नोव्हेंबर
ज्योतीनगरात घर फोडले
२० नोव्हेंबर
दलालवाडीत उघड्या घरात चोरी
२० नोव्हेंबर
उस्मानपुरा येथे मेडिकल दुकान फोडले
२२ नोव्हेंबर
मुथियान रेसिडेन्सी येथे घरफोडी
दुचाकी चोरी- ६२
पर्स पळविण्याच्या घटना- ४
रिक्षाचोरी- २
कारचोरी- १
टेम्पो चोरी- १