जिल्ह्यातील २३९ दारू दुकानांना लागले टाळे !
By Admin | Updated: April 2, 2017 00:28 IST2017-04-02T00:24:20+5:302017-04-02T00:28:27+5:30
जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ३५० दुकानांपैकी २३९ दारू दुकने बंंद करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील २३९ दारू दुकानांना लागले टाळे !
जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ३५० दुकानांपैकी २३९ दारू दुकने बंंद करण्यात आली आहेत. या दुकानांतून उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी सुमारे तीन कोटींचा महसूल मिळत होता.
जिल्ह्यातील २ वाईनबार, ४२ देशी दारूचे दुकाने, ३८ बिअर शॉपी आणि १५८ परमिट रूमचा समावेश आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दारू दुकानांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने ५०० मीटर अंतराच्या आत असलेली दुकाने हटविण्याचे आदेश दोन दोन महिन्यांपूर्वीच दिले होते. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. दारूच्या दुकानामुळे राज्याला मिळणारा कोट्यवधी महसूल बुडणार असल्याने यावर खलबते सुरू होती. जालना जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य आयुक्तांचे आदेश उशिराने मिळाल्याने जिल्ह्यातील नोंदणीकृत दुकानांना शनिवारी नोटीस बजावून २३९ दारू दुकाने बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा उत्पादन शुल्कच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. राज्यातील दारू दुकानदारांचा राज्य शासनावर वाढता दबाव बघता राज्य शासनाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमिट रूम राहतील असे स्पष्ट करीत दुकानारांनी नूतनीकरण करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक दारू दुकानदारांना दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी रात्री अचानक राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी नवे आदेश काढून १ एप्रिल पासून राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या अंतराच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने २३९ दारूची दुकने बंद करण्याचे आल्याचे झावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)