२३०० शेततळी वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 26, 2016 00:46 IST2016-08-26T00:37:08+5:302016-08-26T00:46:59+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा तालुक्यांतून ४१४९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले.

२३०० शेततळी वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत
बाळासाहेब जाधव , लातूर
शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा तालुक्यांतून ४१४९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ३२७५ शेतकऱ्यांचे अर्ज या योजनेसाठी पात्र ठरले. परंतु, यातील फक्त २३०० शेततळी परिपूर्ण प्रक्रिया करून शेततळ्यांच्या वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत आहेत.
कृषी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी २० बाय २२ साईजचे शेततळे घेण्यासाठी त्या-त्या तालुक्यांतील कृषी कार्यालयाकडे शेततळ्यांसाठी अर्ज केले. लातूर तालुक्यातून ७६३, औसा ८६५, निलंगा ६३६, शिरूर अनंतपाळ २०४, रेणापूर ७००, उदगीर १९०, देवणी १९१, जळकोट ७५, अहमदपूर ८५८, चाकूर २१६ अशा एकूण ४१४९ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी कृषी कार्यालयाकडे आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ४०५३ जणांनी सेवाशुल्क भरले. तर परिपूर्ण प्रक्रिया होऊन ३२७५ अर्ज ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. १७६३ जणांना वर्कआॅर्डर दिल्या आहेत. तर २१९ शेतकऱ्यांची शेततळी पूर्ण झाली असून, त्याला यापोटी मिळणारे अनुदानही अदा करण्यात आले आहे. परंतु, एकूण शेततळ्यांपैकी २३०० शेततळी मात्र अद्यापही वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत आहेत.
‘मागेल त्याला शेततळी’ या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४१४९ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. तर ३२७५ शेतकऱ्यांचे अर्ज लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी फक्त २१९ लाभार्थ्यांना शेततळ्यांचा लाभ पहिल्या टप्प्यात मिळाला आहे. त्यामुळे लातूर तालुक्यात ६३, औसा २७, निलंगा १६, शिरूर अनंतपाळ २२, रेणापूर ६१, देवणी ३, जळकोट २, अहमदपूर १०, चाकूर १० तर उदगीर तालुका सर्वाधिक मोठा असतानाही फक्त दोन शेतकऱ्यांना शेतळ्यांचा लाभ मिळाला आहे.