२३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

By Admin | Updated: September 9, 2014 23:59 IST2014-09-09T23:43:07+5:302014-09-09T23:59:10+5:30

बिलोली : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी २३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

23 teachers receive Gurugarav Award | २३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

२३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

बिलोली : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी २३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यात सन २०१३-१४ अंतर्गत अकरा आणि सन २०१४-१५ अंतर्गत बारा शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिली.
ऐनवेळी ठरलेल्या या कार्यक्रमाला माजी आ. गंगाराम ठक्करवाड, सभापती सुभाष पाटील, उपसभापती व्यंकट पाण्डवे, सुभाष गायकवाड आदी हजर होते. सोहळ्याच्या निमित्ताने कवी प्रा. मनोज बोरगावकर यांचे व्याख्यान झाले. सन २०१३-१४ अंतर्गत रामदानी शेख समदानी (अटकळी), दत्ता मारोती नायगावे (बिजूर), एस. ए. हंबरडे (हरनाळा-दुगाव), रेखा निवृत्ती गुटूरकर (तळणी), सोमपुरे शेषाबाई दत्तराम (कार्ला), गोपाळ भगवंत चव्हाण (बेळकोणी), बेबीसरोजनी रघुनाथ होटकर (हुनगुंदा), एस. व्ही. कळसकर (थडीसावळी), भाग्यश्री रामराव डिडेवार (कुंडलवाडी), मुमताज बेगम फत्ते महमंद (कुंडलवाडी), मनोहर संभाजी देशमुख (लोहगाव), त्याचप्रमाणे सन २०१४-१५ अंतर्गत रमेश नागन्ना करोड (नागणी), संतोष विठ्ठल पांचाळ (हिंगणी), शितल इरवंतराव भालेवार (केसराळी), नागेश्वर शंकरराव कुऱ्हाडे (केसराळी), बाबूराव संभाजी ढगे (केरुर), जगन्नाथ पांडुरंग दिंडे (चिरली), झियोओद्दीन इरफान गफ्फार (कुंडलवाडी), एन.डब्ल्यू. सुभानकर (दुगाव), पी.एन. केसराळीकर (रामतीर्थ), एकनाथ पांडुरंग कौठेकर (लोहगाव), उमेश मोहनराव दोमाटे (बिलोली) या सर्व जिल्हा परिषदेअंतर्गत शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी एम. के. बिचकुले, माजी सदस्य शंकर काळे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता हांडे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष आबाराव संगनोड आदी हजर होते.
गटशिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. विस्तार अधिकारी डी. व्ही. धुळशट्टे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
नवीन नांदेडात शिक्षक दिन उत्साहात
नवीन नांदेड : शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के. पी. पल्लेवाड यांची, तर उपमुख्याध्यापक अशोक मादळे व पर्यवेक्षक अशोक लघुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी.जी. पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी वसंत वाघमारे, कैलास माने, सुभाष भवर, एम.जी. जाधव, जाधव, कापसे यांनी परिश्रम घेतले.
कुसुमताई विद्यालय
येथील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संभाजी बिरादार यांची तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेच्या सहसचिव शशिकला बिरादार, मुख्याध्यापक के.ए. जोशी, सहशिक्षिका उज्ज्वला सावते, वंदना सोनाळे, सुमती व्यवहारे, सुनंदा वाघमारे, उषा कारामुंगे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते सहशिक्षक पी.जी. लाळे, व्ही.डी. बिरादार व एस.डी. कऱ्हाड यांना संस्थेअंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सहशिक्षक अरविंद राठोड व वासंती वझरकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वास हंबर्डे तर अर्जुन गुंडाळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मेरवान जाधव, मारोती पेन्टे, लक्ष्मण येसके, आनंदा हिवराळे यांनी सहकार्य केले.
इंदिरा गांधी हायस्कूल
इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एल. माचलोड यांची तर प्रमुख उपस्थितांमध्ये उपमुख्याध्यापिका व्ही. सी. देशमुख, पर्यवेक्षक विठ्ठल भंडारे, बबन जाधव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. निलेवार, भागिरथी बच्चेवार, सिंधू तिडके, माया जयस्वाल, वर्षा गायकवाड, वसुंधरा नलेवाड, अमर बायस, विनोद जमदाडे, ललिता कोल्हेवाड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक नेहा कोलगाडगे यांनी, सूत्रसंचालन कांचन कदम तर प्रज्ञा लोंढे यांनी आभार मानले.

Web Title: 23 teachers receive Gurugarav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.