शार्टसर्किटमुळे गॅरेजसह घराला आग लागून २३ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:04 IST2021-04-13T04:04:11+5:302021-04-13T04:04:11+5:30
रविवारी रात्री झालेल्या या घटनेत गॅरेजमधील पाइपलाइनचे साहित्य, बोअर व मोटार गाड्यांचे इंजिन आदी साहित्यांसह घरातील संसारोपयोगी साहित्य ...

शार्टसर्किटमुळे गॅरेजसह घराला आग लागून २३ लाखांचे नुकसान
रविवारी रात्री झालेल्या या घटनेत गॅरेजमधील पाइपलाइनचे साहित्य, बोअर व मोटार गाड्यांचे इंजिन आदी साहित्यांसह घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अचानक लागलेल्या या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले होते. रात्रीची वेळ असल्याने आग विझवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. आग आगली त्याच गॅरेजच्यावरील मजल्यावर पठाण यांचे कुटुंब राहते. आग लागल्याचे समजताच घरातील सर्व सदस्य बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेऊन पाण्याच्या साह्याने आग विझविली सोमवारी दुपारी पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला असून, यात जवळपास २३ लाखांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.
-- कॅप्शन : अजिंठ्यातील महंमदखा पठाण यांच्या गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत जळालेला साहित्य.