२३ लोटाबहाद्दरांवर येणेगुरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 22:00 IST2016-12-24T21:59:07+5:302016-12-24T22:00:45+5:30
येणेगूर : उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांविरूध्द येणेगूरच्या गुडमॉर्निंग पथकाने शनिवारी पहाटे कारवाई केली़

२३ लोटाबहाद्दरांवर येणेगुरात कारवाई
येणेगूर : उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांविरूध्द येणेगूरच्या गुडमॉर्निंग पथकाने शनिवारी पहाटे कारवाई केली़ तसेच शौचालयाचे बांधकाम करण्याकडे दुलक्ष करणाऱ्या ३० कुटुंबांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण गाव पाणंदमुक्त करण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार गाव पाणंदमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़ येथील गुडमॉर्निंग पथकाने शनिवारी पहाटे उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांविरूध्द कारवाई केली़ कारवाईनंतर संबंधितांना दूरक्षेत्र कार्यालयासमोर आणून समज देवून सोडून देण्यात आले़ ही कारवाई पथकप्रमुख रमाकांत गायकवाड, विस्तार अधिकारी एन.एस. राठोड, पी.एफ. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आर.ए. मोमीन, निवृत्ती बोळके, दिगंबर सूर्यवंशी, लक्ष्मण घुगे, ग्रामीण विकास अधिकारी पी. टी. डावरे, महेश स्वामी, सचिन दूधभाते आदींनी केली़
याशिवाय ग्रामपंचायतीने विशेष मोहीम राबवून ५७ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाचे रेखांकन करुन देण्यात आले. मार्च १७ अखेरपर्यंत गावात १४८६ शौचालये बांधण्याचे उद्दीष्ट ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे़ या उपक्रमांतर्गत गावात ग्रामसभा, मासिक सभा, गृहभेटी, दवंडीद्वारे जागृती करण्यात आली. मात्र, तरीही अनेक नागरिक नागरीक उघड्यावर शौचास जात असून, शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहेत़ ही बाब रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीसांची तालीम करण्यास सुरूवात केली आहे़ नोटीसा दिल्यामुळे आजवर गावातील ११० कुटुंबप्रमुखांनी शौचालय बांधकामास प्रारंभ केला आहे़ मार्च अखेरपर्यंत उद्दीष्टातील १४८६ पैकी ८६७ शौचालये बांधण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे़ त्यासाठी शौचालय नसलेल्या इतर ३० जणांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़ (वार्ताहर)