तीन ठेकेदारांना २३ कोटी ४२ लाखांचा दंड

By Admin | Updated: June 26, 2014 00:40 IST2014-06-26T00:19:15+5:302014-06-26T00:40:13+5:30

नांदेड : जिल्ह्यात वाळू उपसा करताना लिलावधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर 3 ठेकेदारांना जिल्हा प्रशासनाने २३ कोटी ४२ लाख २१ हजार ४३२ रूपये दंड ठोठावला आहे़

23 crore 42 lakh penalty for three contractors | तीन ठेकेदारांना २३ कोटी ४२ लाखांचा दंड

तीन ठेकेदारांना २३ कोटी ४२ लाखांचा दंड

नांदेड : जिल्ह्यात वाळू उपसा करताना लिलावधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर 3 ठेकेदारांना जिल्हा प्रशासनाने २३ कोटी ४२ लाख २१ हजार ४३२ रूपये दंड ठोठावला आहे़
त्यात बिलोली तालुक्यातील सगरोळी घाटाचे लिलावधारक देवेंद्र कोरवा यांना १७ कोटी २७ लाख ९३ हजार ५७ रूपये, येसगी घाटाचे सय्यद मोईनोद्दीन शादुलसाब यांना ४ कोटी १७ लाख ३५ हजार ३७५ रूपये आणि नायगाव तालुक्यातील मनूर येथील लिलावधारक तेजश लोहिया यांना १ कोटी ९६ लाख ९३ हजार रूपये दंड ठोठावला आहे़ तर जिल्ह्यातील दोन ठेकेदारांचा लिलाव रद्द करण्याची कारवाई करण्यात आली़ त्यात धर्माबाद तालुक्यातील येल्लापूर येथील लक्ष्मण कंधारे व मुदखेड तालुक्यातील दत्ता वसमतकर या लिलावधारकांचा समावेश आहे़
दरम्यान, बिलोली तालुक्यातील सगरोळी व येसगी वाळूघाटांप्रकरणी जिल्हा प्रशासनाने ठोठावलेला दंडास महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे़ वारंवार मिळत असलेल्या स्थगितीमुळे महसूल विभाग कारवाईसाठी सरसावत नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: 23 crore 42 lakh penalty for three contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.