दगडफेक प्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: August 28, 2016 00:17 IST2016-08-28T00:15:22+5:302016-08-28T00:17:42+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथील पोलिसांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणात २३ जणाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दगडफेक प्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथील पोलिसांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणात २३ जणाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली होती़ या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे़ तर समिती पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपितांविरूध्द दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे गुरूवारी रात्रीच्या सुमारास आळणी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती़ ही मिरवणूक सुरू झाल्यानंतर काही वेळातच पवन जीवन पौळ याने गितावरून वाद घातला तर शहाजी थोडसरे यांच्या घरासमोर राजेंद्र कांबळे, सोनबा जीवन पौळ यांच्यातही वाद झाला़ मिरवणूक मारूती मंदिराजवळ आली असता गितावरून झालेल्या वादातून बाचाबाची सुरू झाली़ उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करून दगडफेक करण्यात आली़ पोलीस वाहनावर (क्ऱएम़एच़२५-सी़६५९५) दगडफेक झाल्याने काचा फुटल्या़ या प्रकरणी पोलीस कर्मचारी बापूजी पुरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवन पौळ, सोनबा पौळ, गुड्डू पौळ, विजय पौळ, लक्ष्मण पौळ, रोहित कावळे, पप्पू पौळ, नितीन पौळ, भैय्या पौळ, सागर पौळ, विजय पौळ, मधुकर पौळ, बाबा पौळ, जगन्नाथ पौळ, परमेश्वर कांबळे, युवराज पौळ, अमर कांबळे, अजित कदम, रणजित पौळ, जीवन पौळ, संगिता पौळ, कुमार पौळ (सर्व रा़ आळणी) व आशिष वैकुंठे (रा़उस्मानाबाद) या २३ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)