शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मुकुंदवाडीत २२९ अतिक्रमणे भुईसपाट; ८०० जणांचा रोजगार बुडाला, कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:49 IST

२००० नंतर हळूहळू वाढत गेली अतिक्रमणे; सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी भागात महापालिकेने २२९ अतिक्रमणे भुईसपाट केली. यामध्ये २१५ दुकाने, हाॅटेल, गॅरेज, चायनिज सेंटर, लघु उघोग, वेल्डींग, चहा-नाश्ता सेंटर आदी अनेक प्रकारची दुकाने होती. दुकाने पाडण्यात आल्यानंतर किमान ८०० पेक्षा अधिक जणांचा रोजगार बुडाला. प्रत्येक दुकानावर किमान ४ जण कामाला होते. काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त कामगार होते.

अशी वाढली अतिक्रमणेमुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या पाठीमागे १९९५ ते २००० पर्यंत दाट लाेकवसाहती निर्माण झाल्या. एसटी वर्कशॉपसमोरही अशीच परिस्थिती होती. या भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध मूलभूत सोयी सुविधांची गरज भासू लागली. त्यामुळे मुकुंदवाडी स्मशानभूमीपासून एसटी वर्कशॉपपर्यंत आणि पोलिस ठाण्यापासून साेहम मोटर्स कॉर्नरपर्यंत अतिक्रमणे हळूहळू वाढत गेली. या अतिक्रमणांना राजकीय वरदहस्त होते. महापालिकेत चांगला वरदहस्त असल्याने पत्र्याचे शेड मारून दुकाने थाटण्यात येऊ लागली. या अतिक्रमणांनी सर्व्हिस रोड बघितला नाही, सामासिक अंतराचेही भान ठेवले नाही. २५ वर्षांपासून अतिक्रमित दुकानांमध्ये राजरोस व्यवसाय सुरू होता.

कोट्यवधींचे नुकसानशुक्रवारी २२९ अतिक्रमणे पाडण्यात आली. यातील बहुतांश दुकानांमधील सामानही व्यापाऱ्यांना काढता आले नाही. त्यामुळे किमान ८ ते १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज या भागातील व्यापाऱ्यांनी वर्तविला. सामान काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी दिला असता तर एवढे नुकसान झाले नसते, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

दुचाकी वाहने जप्तमुकुंदवाडी स्मशानभूमीला लागून एक जुन्या दुचाकी विक्रीचे दुकान होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एका मोठ्या वाहनात सर्व दुचाकी भरून गरवारे स्टेडियम येथे नेल्या. त्यानंतर त्यांचे शेड जमीनदोस्त केले. जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांचा सायंकाळपर्यंत आटापिटा सुरू होता.

जिकडे तिकडे मलबाअतिक्रमणे पाडल्यानंतर दुकानांच्या शेड, पत्र्याचा मलबा पडून होता. व्यापाऱ्यांनी हा मलबा उचलण्यासाठी दुपारनंतर प्रयत्न सुरू केले. कटरच्या साह्याने तुकडे करून मलबा जमा करण्यात येत होता.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmukundawadi areaमुकुंदवाडी परिसरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर