जिल्ह्यातील २२३ गावे जलयुक्त शिवार योजनेत

By Admin | Updated: December 17, 2015 00:17 IST2015-12-17T00:07:16+5:302015-12-17T00:17:33+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२३ गावांचा, तर मराठवाड्यातील सुमारे १,५०० गावांचा समावेश करण्यात आला आहे.

223 villages in the Jalate Shivar Yojana | जिल्ह्यातील २२३ गावे जलयुक्त शिवार योजनेत

जिल्ह्यातील २२३ गावे जलयुक्त शिवार योजनेत

औरंगाबाद : जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२३ गावांचा, तर मराठवाड्यातील सुमारे १,५०० गावांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विभागातील १८२ गावांची संख्या कमी झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, सिमेंट नाला बंधारे इ. कामे केली जातात.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी डीपीसीमधून दहा टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
यामध्ये लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी २०४ गावे असताना २०१६-१७ साठी १७६ गावे निवडण्यात आली आहेत. त्यामुळे २८ गावे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी निवडण्यात आली आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ गावे, बीड जिल्ह्यात २९ गावे आणि नांदेडमध्ये ३५ गावे कमी निवडण्यात आली आहेत.

Web Title: 223 villages in the Jalate Shivar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.