पंचायत विभागात २२ जणांच्या बदल्या

By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:43:07+5:302014-06-19T00:17:26+5:30

बीड : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागांतर्गत मंगळवारी २२ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनानुसार पार पडली़

22 transfers in Panchayat section | पंचायत विभागात २२ जणांच्या बदल्या

पंचायत विभागात २२ जणांच्या बदल्या

बीड : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागांतर्गत मंगळवारी २२ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनानुसार पार पडली़ सहा विस्तार अधिकारी, दोन ग्रामविकास अधिकारी व १४ ग्रामसेवकांचा समावेश आहे़
समुपदेशनानुसार जिल्हा परिषद सभागृहात बदल्या झाल्या. सीईओ राजीव जवळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नईमोद्दीन कुरेशी, कक्षाधिकारी एस़ एस़ गाडे उपस्थित होते़ बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी गोकुळ बागलाने यांची पाटोदा, अंबाजोगाई येथील विस्तार अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांची केजला तर पाटोदा येथील बापू राख यांची बीड येथे प्रशासकीय बदली झाली़
या तीन प्रशासकीय बदल्या वगळता उर्वरित सर्व बदल्या विनंतीवरुन झाल्या़ माजलगावहून अरुण मोरे यांची बीडला, केजचे सुनील शिंदे शिरुरला तर रामचंद्र रोडेवाड यांची परळीहून माजलगावला बदली करण्यात आली़ परळी येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी साहेबा भताने यांची अंबाजोगाईला, धारुरचे पंडित जोशी यांची माजलगावला बदली झाली़
१४ ग्रामसेवकांच्या बदल्या
मंगळवारी १४ ग्रामसेवकांच्या बदल्या पार पडल्या़ गेवराई पंचायत समितीतील भाऊसाहेब मिसाळ यांची बीड, गेवराईतीलच गहिनीनाथ मिसाळ यांचीही बीडला तर बीड येथील ओम चोपने यांची केजला बदली करण्यात आली़ बीडच्या मीरा धुमाळ यांना आष्टी, गेवराईचे किरण ठोंबरे केज, माजलगावचे राजाभाऊ जोगदंड यांना धारुरला हलविण्यात आले़ माजलगावातील सविता मुळे यांची केज, अजय कुलकर्णी यांची परळी, सुहास गायकवाड यांची धारुरला बदली झाली़ परळीतील अविनाश तोटे यांची माजलगावला बदली झाली़ गेवराईचे नंदकिशोर जाधव बीड, बीडचे सुनील वाघमारे गेवराई, बीडचे प्रकाश चव्हाण गेवराई व गेवराईचे अशोक चव्हाण यांची बीडला बदली करण्यात आली़ (प्रतिनिधी)
लेखा विभागात बदल्या नव्हे ‘बदला’!
एकाच विभागात पाच वर्षे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्याचा नियम आहे़ मात्र, हा नियम केवळ बांधकाम व लेखा विभागातच लागू करण्यात आला आहे़ लेखा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी दिगंबर गंगाधरे यांना बांधकाम विभागात हलविले आहे़ गंगाधरे यांनी नियमबाह्य कामांविरुद्ध नुकतेच आंदोलन केले़ तेंव्हापासून ते वरिष्ठांच्या निशाण्यावर होते़ त्यांची बदली नव्हे तर बदला घेतला अशी चर्चा बुधवारी लेखा विभागात होती़
बदल्यांची संचिका साहेबांसोबत !
लेखा विभागातील बदल्यांची माहिती विचारली असता वरिष्ठ सहायक लेखा देशमुख म्हणाले, बदल्यांची संचिका वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांनी सोबत नेली आहे. ते दौऱ्यावर आहेत.

Web Title: 22 transfers in Panchayat section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.