२२ जण झाले सहायक उपनिरीक्षक

By Admin | Updated: May 27, 2014 00:58 IST2014-05-27T00:23:23+5:302014-05-27T00:58:40+5:30

उस्मानाबाद : एकीकडे केंद्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर ‘अच्छे दिन आएँगे’ चा गजर देशभर सुरू आहे़ याच पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी तब्बल १५६ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली आहे़

22 people Assistant Sub-Inspector | २२ जण झाले सहायक उपनिरीक्षक

२२ जण झाले सहायक उपनिरीक्षक

 उस्मानाबाद : एकीकडे केंद्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर ‘अच्छे दिन आएँगे’ चा गजर देशभर सुरू आहे़ याच पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी तब्बल १५६ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली आहे़ त्यामुळे पोलिस या कर्मचार्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ आल्याचे म्हटले जात आहे़ पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस दलातील १५६ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली आहे़ यात २२ हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी, ५२ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी तर ८२ पोलिस कॉन्स्टेबल यांना पोलिस नाईकपदी बढती देण्यात आली आहे़ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये पोलिस मुख्यालयातील पोह अरूण पवार, अमीरअली सय्यद, महादेव पवार, इप्तेकार उलहक्क, सुखदेव मोरे, शाहू शहाणे, एसीबीतील दिलीप भगत, ढोकी पोलिस ठाण्यातील नंदकुमार दंडे, वाशी पोलिस ठाण्यातील कैलास मसणे, तुळजापूर पोलिस ठाण्यातील दीपक माने, मुजाहिद पटेल, कळंब पोलिस ठाण्यातील रतन नाईकवाडी, तामलवाडी पोलिस ठाण्यातील प्रभाकर कुलकर्णी, सुभाष करवर, कमल खंडागळे, उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील रेखू राठोड, परंडा पोलिस ठाण्यातील सुरेश शिंदे, उमरगा पोलिस ठाण्यातील विलास मोरे, किशोर काळे, साहेबराव शिंदे, एम़टी़मधील गणपत पोतदार, लोहारा पोलिस ठाण्यातील अशोक गायकवाड यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे़ ८२ पोलिस कॉन्स्टेबलना पोलिस नाईकपदी बढती देण्यात आली आहे़ यामध्ये पोलिस मुख्यालयातील विष्णू मुंडे, दत्ताजी सातपुते, संजीवन जाधवर, रवि गंगावणे, अतुल यादव, धनंजय लाटे, योगेश मांडोळे, अल्लानूर शेख, जावेद काझी, सुखदेव राठोड, नागेश वाघमोडे, सचिन गायकवाड, तनवीर पिरजादे, कपिल बोरकर, प्रदीप वाघमारे, ए़एऩमाने, एम़बीक़ारभारी, सविता रासणे, वनिता वाघमारे, राजू डांगे, कैलास बागुल, नळदुर्ग पोलिस ठाण्यातील कांतू राठोड, राहुल नाईकवाडी, अजय गरड, मोहसीनखाँ पठाण, उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील सुधाकर भांगे, शाहूराज धनवडे, जयप्रकाश पवार, सुनील हंगे, विठ्ठल पेठे, तुळशीराम भोसले, अनिरूद्र कावळे, शबाना मुल्ला, वैशाली कौरव, डॉग स्कॉड मधील भागवत शेंडगे, प्रकाश अवताडे, सचिन शिंदे, कळंब पोलिस ठाण्यातील दिपक जाधव, शीतल जाधव, मुरूम पोलिस ठाण्यातील कैलास चाफेकर, संगीता दसवंत, जिविशातील सुनीता राठोड, वाहतूक शाखेतील स्वप्नील ढोणे, बाबासाहेब शेख, राजूदास राठोड, येरमाळा पोलिस ठाण्यातील विद्या कदम, राकेश पवार, नळदुर्ग महामार्ग मधील संदीप यादव, प्रमोद जमादार, उमरगा पोलिस ठाण्यातील अमर महानुरे, अंबी पोलिस ठाण्यातील सुनील दहिहंडे, अमोल जावळे, परंडा पोलिस ठाण्यातील विनोद जानराव, कल्पना दळवी, बेंबळी पोलिस ठाण्यातील संध्या चव्हाण, ज्योती गिरी, मंगल जाधव, अविनाश जाधव, संतोष सोनवणे, नितीन सुरवसे, उमरगा पोलिस ठाण्यातील हुसेन सय्यद, स्थागुशामधील विक्रम सावंत, शिराढोण पोलिस ठाण्यातील नवनाथ माने, बीडीडीएस मधील अमजद पठाण, अब्दुल पल्ला, राहुल जावळे, तुळजापूर पोलिस ठाण्यातील रसुलखान पठाण, श्रीनिवास आगलावे, हीना सय्यद, एसीबीतील बालाजी तोडकर, एमटी मधील प्रमोद रोटे, धनंजय म्हेत्रे, संतोष लाटे, अजहरोद्दीन काझी, तुळजा भवानी मंदिर सुरक्षा येथील अनूसया मडवी, भूम पोलिस ठाण्यातील रतन घोगरे, दत्तात्रय कळबंडे, शफी शेख, आरसीपीमधील प्रवीण माने व संतोष सोपान वाडकर यांना पोलिस नाईकपदी बढती देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. पोलिस हवालदारपी पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये पोलिस मुख्यालयातील पोना महेश भारती, बाळासाहेब होडशीळ, संभाजी बोंदर, लक्ष्मण चांदणे, प्रदीप ठाकूर, शशिकांत गुरव, तानाजी माने, सुनील मुंडे, राजेंद्र राऊत, पोपट बनसोडे, यशवंत सगर, दीपक गोडे, अ‍ेसीबीतील पोना राजाराम चिखलीकर, उमरगा पोलिस ठाण्यातील व्यंकट अडसुळे, उमाजी गायकवाड, विरपक्ष वाघमारे, संजय लोखंडे, दाजीबा गव्हाळे, अब्दुलगनी शेख, वाशी पोलिस ठाण्यातील महादेव ढगे, युवराज तेरकर, वाहतूक शाखेतील चंद्रशेखर बालकुंदे, तुळजापूर पोलिस ठाण्यातील संजय पाटील, प्रमोद ओव्हाळ, उमाकांत माळाळे, जिविशातील विजयकुमार बिराजदार, लक्ष्मीकांत भोळे, नळदुर्ग पोलिस ठाण्यातील संजीव जाधव, संजीवन शिंदे, श्रीमंत मिसाळ, एमटीमधील किरण डोके, भूम पोलिस ठाण्यातील श्रीकांत गरड, नळदुर्ग महामार्गमधील बाळासाहेब शिंदे, संजय पवार, उस्मानाबाद शहर ठाण्यातील संजय सूर्यवंशी, शिवदास पवार, त़मं़सुरक्षा कक्षातील जगन्नाथ काळदाते, महिला तक्रार निवारण कक्षातील विलास साखरे, परंडा पोलिस ठाण्यातील वलीउल्ला काझी, सुभाष तांबाडे, जुबेर शेख, उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यातील विजयसिंह ठाकूर, शहजादा शेख,कळंब पोलिस ठाण्यातील आगतराव कठारे, सुधाकर गोरे, स्थागुशामधील नितीन कुलकर्णी, लोहारा पोलिस ठाण्यातील पांडुरंग आलुरे, बेंबळी पोलिस ठाण्यातील कृष्णा चौधरी, येरमाळा पोलिस ठाण्यातील रविंद्र कठारे, प्रशांत सोनवणे यांचा समावेश आहे.

Web Title: 22 people Assistant Sub-Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.