शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

१८ जागांसाठी २२९ नामनिर्देशनपत्र दाखल

By admin | Updated: September 3, 2015 00:17 IST

कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होवू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले़

कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होवू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले़ बाजार समितीचा संचालक होण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षाच्या पॅनलमधून जागा मिळावी, यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली आहे़कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक निवडीसाठी ११ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे़ निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी तब्बल २२९ अर्ज दाखल झाले आहेत़ यात सेवा संस्था मतदार संघातील सर्वसाधारण ७ जागेसाठी ८०, इतर मागासवर्गीय संवर्गातील एका जागेसाठी ८, महिला प्रवर्गातील २ जागांसाठी १५, भटक्या जाती-जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी १२, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गाच्या २ जागांसाठी ४८, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी १२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी १० उमेदवारी अर्ज करण्यात आले आहेत़ व्यापारी मतदार संघातील २ जागांसाठी ३४ तर हमाल मापाडी मतदार संघातील ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ या अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ या प्रक्रीयेनंतर सर्व राजकीय पक्षही आपापले उमेदवार निश्चित करणार आहेत़ त्यामुळे अर्ज भरलेल्या इच्छुकांनी पक्षाच्या पॅनलमध्ये जागा मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे़ (वार्ताहर) महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमानुसार ज्या उमेदवाराकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना आहे, त्या उमेदवाराचा तो ग्रामपंचायत किंवा सेवा संस्थेचा सदस्य असेल तरीही त्याला ग्रामपंचायत किंवा सेवा संस्थेच्या मतदार संघातून बाजार समितीची निवडणूक लढविता येणार नाही़ त्यामुळे उमेदवाराला व्यापारी मतदार संघातूनच निवडणूक लढवावी लागणार आहे़ त्यामुळे या निवडणुकीत व्यापारी व ग्रामपंचायत किंवा सेवा संस्था मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या तालुक्यातील सर्वच पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांची इच्छा अपूर्णच राहणार असल्याचे चित्र आहे़ व्यापारी मतदार संघात दोनच जागा असल्याने या पुढाऱ्यांना यंदा प्रचाराची धुरा संभाळावी लागणार आहे़ हा नियम माहिती झाल्याने काहींनी नातेवाईकांची उमेदवारी दाखल केली आहे़ मात्र, ज्यांना नियम माहिती नाही त्यांना मात्र, मोठा फटका बसणार आहे़