१८ जागांसाठी २२९ नामनिर्देशनपत्र दाखल

By Admin | Updated: September 3, 2015 00:17 IST2015-09-03T00:17:40+5:302015-09-03T00:17:40+5:30

कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होवू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले़

22 nominations for 18 posts | १८ जागांसाठी २२९ नामनिर्देशनपत्र दाखल

१८ जागांसाठी २२९ नामनिर्देशनपत्र दाखल


कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होवू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले़ बाजार समितीचा संचालक होण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षाच्या पॅनलमधून जागा मिळावी, यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली आहे़
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक निवडीसाठी ११ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे़ निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी तब्बल २२९ अर्ज दाखल झाले आहेत़ यात सेवा संस्था मतदार संघातील सर्वसाधारण ७ जागेसाठी ८०, इतर मागासवर्गीय संवर्गातील एका जागेसाठी ८, महिला प्रवर्गातील २ जागांसाठी १५, भटक्या जाती-जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी १२, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत़
ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गाच्या २ जागांसाठी ४८, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी १२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी १० उमेदवारी अर्ज करण्यात आले आहेत़ व्यापारी मतदार संघातील २ जागांसाठी ३४ तर हमाल मापाडी मतदार संघातील ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ या अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ या प्रक्रीयेनंतर सर्व राजकीय पक्षही आपापले उमेदवार निश्चित करणार आहेत़ त्यामुळे अर्ज भरलेल्या इच्छुकांनी पक्षाच्या पॅनलमध्ये जागा मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे़ (वार्ताहर)
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमानुसार ज्या उमेदवाराकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना आहे, त्या उमेदवाराचा तो ग्रामपंचायत किंवा सेवा संस्थेचा सदस्य असेल तरीही त्याला ग्रामपंचायत किंवा सेवा संस्थेच्या मतदार संघातून बाजार समितीची निवडणूक लढविता येणार नाही़ त्यामुळे उमेदवाराला व्यापारी मतदार संघातूनच निवडणूक लढवावी लागणार आहे़ त्यामुळे या निवडणुकीत व्यापारी व ग्रामपंचायत किंवा सेवा संस्था मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या तालुक्यातील सर्वच पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांची इच्छा अपूर्णच राहणार असल्याचे चित्र आहे़ व्यापारी मतदार संघात दोनच जागा असल्याने या पुढाऱ्यांना यंदा प्रचाराची धुरा संभाळावी लागणार आहे़ हा नियम माहिती झाल्याने काहींनी नातेवाईकांची उमेदवारी दाखल केली आहे़ मात्र, ज्यांना नियम माहिती नाही त्यांना मात्र, मोठा फटका बसणार आहे़

Web Title: 22 nominations for 18 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.