खरीप हंगामासाठी २२ कोटींचा पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:58 IST2017-08-10T23:58:47+5:302017-08-10T23:58:47+5:30

३१ जुलैनंतर पाच दिवसांच्या मुदतवाढीअखेर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतकºयांनी २२ कोटींचा पीकविमा भरला आहे.

 22 million paddyvima for Kharif season | खरीप हंगामासाठी २२ कोटींचा पीकविमा

खरीप हंगामासाठी २२ कोटींचा पीकविमा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांना शेवटपर्यंत धावपळ करावी लागली. ३१ जुलैनंतर पाच दिवसांच्या मुदतवाढीअखेर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतकºयांनी २२ कोटींचा पीकविमा भरला आहे. सर्वात कमी पीकविमा अर्ज सीएससी सेंटरवर भरण्यात आले आहेत.
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) आॅनलाइन पीकविमा भरण्याचे नियोजन केले. मात्र, त्यासाठी आवश्यक पूर्व नियोजन केले नाही. त्यातच वेबसाईटच्या कासवगतीमुळे महिनाभरात केवळ २० हजार शेतकºयांनाच आॅनलाईन पीकविमा अर्ज भरता आले. पाच आॅगस्ट रोजी दिलेल्या मुदतवाढीच्या दिवशी सीएससी सेंटरवर चार हजार ९०० शेतकºयांचे पीकविमा अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. पीकविमा स्वीकारण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी सुरुवातीपासून नियमांवर बोट ठेवून टाळाटाळ केली. परिणामी यंदा केवळ ४५ हजार शेतकºयांच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा भरता आला. सीएससी सेंटर व राष्ट्रीयीकृत बँकांनी मिळवून एकूण चार कोटी ३५ लाखांचा पीकविमा स्वीकारल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यातील एकूण शेतकºयांची संख्या चार लाख ३१ हजारांपर्यंत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिल्याचा अंदाज आहे.

Web Title:  22 million paddyvima for Kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.