२२ लाखांचे सोया तेल जप्त
By Admin | Updated: October 18, 2014 00:04 IST2014-10-18T00:01:18+5:302014-10-18T00:04:41+5:30
औरंगाबाद : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी १७ आॅक्टोबर रोजी भेसळीच्या संशयावरून २२ लाख रुपयांचे सोयाबीन तेल जप्त केल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.

२२ लाखांचे सोया तेल जप्त
औरंगाबाद : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी १७ आॅक्टोबर रोजी भेसळीच्या संशयावरून २२ लाख रुपयांचे सोयाबीन तेल जप्त केल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
दिवाळीत विविध पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचा वापर केला जातो. या दिवसांत खाद्यतेलाची विक्री अनेकपटींनी वाढते. मागणी पूर्ण करण्यासाठी भेसळयुक्त खाद्यतेल विक्री केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. आज प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वाळूज टोल नाका येथे तेल वाहतूक करणाऱ्या दोन टँकरला अडवून त्यांची तपासणी केली. यात भेसळयुक्त सोयाबीन तेल असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आला. लगेच ३९ हजार किलो तेल जप्त करण्यात आले.
बाजारात या तेलाची किंमत २२ लाख ६९ हजार ६२७ रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या टँकरचा क्रमांक एम.एच.- ४६, एफ- ६०६० व दुसऱ्या टँकरचा क्रमांक एम.एच.- ४६, डी.- ७०७० असा आहे. यासंदर्भात सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी सांगितले की, सोयाबीन तेलाचे नमुने भेसळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.