२२ कोटींच्या ९ पाणीपुरवठा योजनांना मान्यता

By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:13:29+5:302015-04-01T01:04:01+5:30

औरंगाबाद :९ पाणीपुरवठा योजनांना जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सोमवारी (दि.३०) झालेल्या मासिक बैठकीत मंजुरी देण्यात आली.

22 crores water supply schemes are approved | २२ कोटींच्या ९ पाणीपुरवठा योजनांना मान्यता

२२ कोटींच्या ९ पाणीपुरवठा योजनांना मान्यता

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ गावांत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत २१ कोटी ८९ लाख ५७ हजार २७० रुपये खर्चाच्या ९ पाणीपुरवठा योजनांना जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सोमवारी (दि.३०) झालेल्या मासिक बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या सन २०१४-१५च्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. या कृती आराखड्यात ३२० गावांचा समावेश आहे. त्यातील ९ गावांत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याचे श्रीराम महाजन यांनी सांगितले.
या बैठकीला शिक्षण व आरोग्य सभापती विनोद तांबे, बांधकाम व अर्थ सभापती संतोष जाधव यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

Web Title: 22 crores water supply schemes are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.