शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

महापालिकेकडून माती, दगड उचलण्याचे २२ कोटी रुपये; कंपनीने हळूहळू कचऱ्याचे ‘वजन’ वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 17:57 IST

पहिल्या दिवशीपासून कचरा उचलणाऱ्या कंपनीचा लबाडीचा खेळ

ठळक मुद्देदरमहा अडीच कोटींचे बिल कंपनीच्या चालबाजीचा पर्दाफाशजनतेच्या पैशाची राजरोस लूट 

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या रेड्डी कंपनीने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. फेब्रुवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत कंपनीला २२ कोटींहून अधिक रक्कम महापालिकेने अदा केली आहे. कंपनीने दर महिन्याला शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजन अत्यंत सोयीस्करपणे वाढविले आहे. कंपनीच्या या चालबाजीत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारीही सहभागी असल्याचे निदर्शनास येत आहे. 

शनिवारी रेड्डी कंपनीचे तीन हायवा ट्रक नगरसेवकांनी पडेगाव येथे पकडले. पकडलेले ट्रक महापालिकेत आणण्यात आले. हे ट्रक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी रिकामे करून बघितले. ट्रकमध्ये कचरा कमी आणि माती, दगड मोठ्या प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले.  आयुक्तांनी कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे घाटी रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्टही कचऱ्याच्या वाहनांमध्ये टाकण्यात आला. घाटी प्रशासनावरही फौजदारीचे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या निर्णयामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

शहरात कचराकोंडी झालेली असताना राज्य शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. पडेगाव येथे प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी एकच कंपनी असावी म्हणून महापालिकेने रेड्डी कंपनीची नेमणूक केली. एक टन कचरा घरोघरी जाऊन कंपनीने जमा केल्यास मनपा १८६५ रुपये देईल, असे ठरले. कंपनीने मागील एक वर्षामध्ये शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन सुरूच केले नाही.

ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याची जबाबदारी कंपनीवर असतानाही मिक्स कचराच प्रक्रिया केंद्रावर जात आहे. कंपनीचे काम अजिबात समाधानकारक नसतानाही महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीसमोर रेड कार्पेट अंथरूण उभे आहेत. कंपनीला शहरात आठ ठिकाणी मोफत पार्किंगची सोय करून दिली. मनपाच्या मालकीच्या ७० रिक्षा कंपनी मोफत वापरत आहे. पार्किंग शुल्क, रिक्षांचे भाडेही मनपा कंपनीकडून वसूल करायला तयार नाही.

फेब्रुवारी २०१९ मध्ये कामाला सुरुवात- पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने शहरात फेब्रुवारी २०१९ मध्ये कचरा उचलण्याचे काम सुरू केले. प्रायोगिक तत्त्वावर काही झोनमध्ये कामाला सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात कंपनीने ३,७१४.४ मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा केला. मनपा अधिकाऱ्यांनीही डोळे बंद करून पहिल्या महिन्याचे बिल ६९ लाख ५५ हजार ९५७ रुपये दिले. - दुसऱ्या महिन्यात कंपनीने ४,५७८.९४ मेट्रिक टन कचरा एका महिन्यात उचलल्याचा दावा केला. मनपाने ८५ लाख ७६ हजार ३५५ रुपये कंपनीला अदा केले. एप्रिल महिन्यात कंपनीने ७,४५९.२६ मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा केला. मनपाने १ कोटी ३९ लाख ७४ हजार ९६७ रुपये कंपनीला त्वरित दिले. - मे महिन्यात कंपनीचा आलेख अचानक खाली आला. या महिन्यात कंपनीने फक्त ९०९४.५ मेट्रिक टन कचरा जमा केला. त्यानंतरही मनपाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कंपनीला १ कोटी ७९ लाख ७३ हजार ८२७ रुपये दिले. सध्या कंपनीला दरमहा अडीच कोटींहून अधिक रक्कम प्रदान करण्यात येत आहे. मागील बारा महिन्यांमध्ये कंपनीला मनपाने किमान २२ कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. 

‘लोकमत’ने घोटाळा उघडकीस  आणला तरी...रेड्डी कंपनी कचऱ्यात दगड, चिंध्या, माती टाकून कशा पद्धतीने वजन वाढवत आहे, याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने जुलै २०१९ मध्ये केला होता. चिकलठाणा प्रक्रिया केंद्रात हायवा ट्रकमध्ये भरून आणलेले मोठमोठे दगड छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आले होते. या घोटाळ्यावर महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे पांघरूण घालण्याचे काम केले. ४घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनीच महापौरांना चौकशी अहवाल देतो असे सांगितले होते. आजपर्यंत भोंबे यांनी चौकशीही केली नाही. कंपनीच्या या सर्व गैरव्यवहाराची माहिती भोंबे आणि त्यांच्या एका निकटवर्तीय वरिष्ठ लिपिकाला आहे. त्यांच्या सहीने कंपनीला आजपर्यंत मनमानी पद्धतीने बिले अदा करण्यात आली आहेत. 

रेड्डी कंपनीला अशी वाटली खिरापतमहिना    वजन (मे.टन)    दिलेली रक्कम    फेब्रुवारी    ३,७१४.४    ६९,५५,९५७माच    ४,५७८.९४    ८५,७६,३५५एप्रिल    ७,४५९.२६    १,३९,७४,९६७मे    ९०९४.५    १,७९,७३,८२७जून    ११,२१०.३६३    २,०९,९२,९३१जुलै    १४,५९३.९०५    २,७२,९०,९१५आॅगस्ट    १३,१९३.८५५    २,५०,०१,१५७सप्टेंबर    १३,५७३.६२    २,५३,७३,६५४आॅक्टोबर    १३,७९८.५५५    २,५८,१५,६१७एकूण        १७,१९,५५,३८०(नोव्हेंबरपासून आजपर्यंत अडीच कोटी दरमहा बिल दिले जात आहे.)

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी