तीन तालुक्यातून २२ जणांचे आक्षेप
By Admin | Updated: February 5, 2015 00:54 IST2015-02-05T00:48:39+5:302015-02-05T00:54:03+5:30
उस्मानाबाद : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे आणि नव्याने अस्तिवात आलेल्या ४२९ ग्रामपंचायतीचा प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून

तीन तालुक्यातून २२ जणांचे आक्षेप
उस्मानाबाद : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे आणि नव्याने अस्तिवात आलेल्या ४२९ ग्रामपंचायतीचा प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून, ४ फेब्रुवारी पर्यंत कळंब, उस्मानाबाद व उमरगा तालुक्यातून निवडणूक आरक्षण व प्रभाग रचनेवर २२ जणांनी आक्षेप दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील ४२९ गावात प्रभागनिहाय कागदपत्रांची जमवाजमव करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या आरक्षणासंदर्भात हरकत दावे दाखल करण्यासाठीचा कालावधी ५ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आल्याने राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे.
२0११ च्या जनगणनेनुसार एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामध्ये ५0 टक्के सहभाग महिला उमेदवारांना देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने ४२९ ग्रामपंचयातीचे आरक्षण व प्रभागरचना २८ जानेवारी रोजी त्या त्या तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले होते. यावर उस्मानाबाद तालुक्यातून ८, कळंब १० तर उमरगा तालुक्यातून चार अशा २२ जणांनी निवडणुक आरक्षण व प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. काही तालुक्यातील ग्रामंपचायत निवडणूक आरक्षणाबाबत तलाठ्यांनी चुकीचे माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने आरक्षण व प्रभाग रचनेबाबत काही जणांनी आक्षेपही घेतल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जुलै ते डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. प्रभाग रचना व आरक्षणाचा नमुना ‘ब’ प्रस्तावावर कुणाला हरकती, सूचना दाखल करावयाच्या असल्यास त्या ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.