शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

२३ दिवस पाळत ठेवून पकडलेल्या चोरट्याकडून २२ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 15:21 IST

फायनान्स कंपनीची दुचाकी असल्याची थाप मारून विक्री करीत

ठळक मुद्देएक चोरायचा दुचाकी व नेऊन द्यायचा दुसऱ्यालासिटीचौक पोलिसांची कामगिरी 

औरंगाबाद : शहरातील जामा मशिद, शहागंज भाजी मंडी या गर्दीच्या ठिकाणांवरून दुचाकी चोरीचे प्रकार वाढल्याचे लक्षात आल्यावर सिटीचौक पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी तब्बल २३ दिवस पाळत ठेवली. पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले व एका चोरट्याला त्यांनी रंगेहाथ पकडले. त्याने २२ दुचाकी चोरल्याचे सांगून त्या गाड्या विक्री करण्यासाठी त्याच्या साथीसाराकडे दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी सिल्लोड तालुक्यात जाऊन त्याच्या साथीदाराला पकडले आणि त्याच्याकडून २२ दुचाकी हस्तगत केल्या.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोऱ्या वाढल्या आहेत. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी वाहन चोरीच्या वेळा आणि ठिकाणांचा अभ्यास केला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सिटीचौक पोलिसांनी शहागंज भाजीमंडी, कॅन्सर हॉस्पिटल आणि जामा मशिद परिसरात साध्या वेशातील ६ पोलीस तैनात केले. चोरट्यांना संशय येऊ नये यासाठी पोलीस असे लिहिलेल्या दुचाकीचा वापर त्यांनी टाळला. बहुतेक वाहनचोऱ्या सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत झाल्या होत्या. रमजानमध्ये या तिन्ही ठिकाणी गर्दी असायची. याचाच लाभ घेऊन चोरटा दुचाकी पळवित होता. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यामुळे त्याची चेहरेपट्टी पोलिसांना माहिती होती. छुप्या पहाऱ्याच्या २३ व्या दिवशी शहागंज भाजीमंडीत सकाळी एक जण मोबाईलवर बोलत दुचाकीला चावी लावत होता. त्याने दोन दुचाकींना चाव्या लावल्या, परंतु त्यांचे कुलूप उघडले नाही. त्यामुळे तो तिसऱ्या दुचाकीला चावी लावून फिरवत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. ठाण्यात नेऊन कसून चौकशी सुरू करताच त्याने त्याचे नाव गौसखा काले खॉ पठाण (ह. मु. ब्रीजवाडी, मूळ रा. नाणेगांव , ता. सिल्लोड ) असे सांगितले. मी दुचाकी चोरून साथीदार नवाब खॉ उस्मानखॉ पठाण (३०, रा. गोद्री, ता. भोकरदन) याला नेऊन देतो. नवाबखॉ चोरलेल्या दुचाकी विक्री करतो, अशी कबुली त्याने दिली.

नंबर प्लेट, सीट कव्हर बदलायचेआरोपी चोरलेल्या दुचाकीची नंबर प्लेट काढून त्यावर बनावट क्रमांक टाकत. दुचाकीचे जुने सीट कव्हर काढून रंगीबेरंगी सीट कव्हर टाकणे, रेडियमचे पट्टे लावून ते दुचाकीचा चेहरामोहरा बदलत.

फायनान्स कंपनीची दुचाकी असल्याची थाप मारून विक्री करीतआरोपी नवाबखॉ हा त्याच्या गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकरी, मजूर यांना फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या दुचाकी असल्याची थाप मारून २० ते २५ हजारांत दुचाकी विक्री करायचा. ७५ ते ८० टक्के रक्कम आधी घेऊन उर्वरित रक्कम गाडीची कागदपत्रे देताना द्या असे सांगायचा. पोलिसांनी नवाबखॉला अटक केली. यानंतर त्याने सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यात विक्री केलेल्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

यांनी केली कामगिरीपोलीस निरीक्षक संभाजी पवार, भंडारे , फौजदार के. डी. महाडुळे, कर्मचारी खैरनार, संजय नंद, माजीद पटेल, देशराज मोरे आणि संतोष शंकपाळ.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीPoliceपोलिस