शहरात २१८, ग्रामीणमध्ये ४४८ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:03 IST2021-05-15T04:03:57+5:302021-05-15T04:03:57+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ६६५ कोरोनाबाधितांची शुक्रवारी दिवसभरात भर पडली, तर जिल्ह्यातील ३३, तर इतर जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू झाला. ...

शहरात २१८, ग्रामीणमध्ये ४४८ रुग्णांची भर
औरंगाबाद : जिल्ह्यात ६६५ कोरोनाबाधितांची शुक्रवारी दिवसभरात भर पडली, तर जिल्ह्यातील ३३, तर इतर जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू झाला. शहरातील १९०, तर ग्रामीणमधील ५५८, अशा एकूण ७४८ रुग्णांची भर पडली. शहरात २१८, तर ग्रामीण भागात ४४७ रुग्ण आढळून आले. सक्रिय रुग्ण घटत असल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे.
आतापर्यंत १ लाख ५३ हजार ७७९ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी १ लाख २६ हजार २६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत २८७८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६ हजार ८७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
उपचार सुरू रुग्णांत शहरातील १३४८, तर ग्रामीण भागातील ५५२७ रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या ३३ मृत्यूत शहरातील १३, तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्राच्या खालोखाल वैजापूर तालुक्यात ११५३, औरंगाबाद तालुक्यात १०७८, तर गंगापूर तालुक्यात ८५१ सक्रिय रुग्णसंख्या आहे.
--
मनपा हद्दीत २१८ रुग्ण
सातारा परिसर ४, बीड बायपास २, शिवाजीनगर ३, गारखेडा परिसर ३, एन-११ येथे १, न्यू हनुमाननगर २, मुकुंदवाडी २, औरंगपुरा १, हर्सूल ६, कार्तिकनगर १, म्हसोबानगर २, जटवाडा रोड १, नंदीग्राम कॉलनी २, जाधववाडी ४, चाणक्यनगर १, उल्कानगरी १, मिलकॉर्नर १, बंजारा कॉलनी १, अंगुरी बाग १, इंदिरानगर १, मयूर कॉलनी १, मेहेरनगर १, न्यू विशालनगर १, प्रथमेशनगर १, भारतनगर १, अलोकनगर १, एन-८ येथे ३, एन-७ येथे १, सिडको १, एन-११ येथे १, कटकट गेट १, समर्थनगर १, कांचनवाडी २, मयूर पार्क २, गणेशनगर १, सारा वैभव १, चिकलठाणा १, संभाजी कॉलनी १, गणेशनगर १, एन-९ येथे १, एन-३ येथे २, नागेश्वरवाडी १, रमानगर २, नंदवनवन कॉलनी १, श्रेयनगर १, प्रतापनगर १, मोंढा नाका १, भगीरथनगर १, एन-४ येथे २, पेठेनगर २, सहयोगनगर २, एसआरपीएफ कॅम्प २, शहानूरवाडी १, आकाशवाणी १, क्रांतीनगर अदालत रोड १, पडेगाव १, अरिहंतनगर १, लक्ष्मी कॉलनी २, उस्मानपुरा १, कोकणवाडी १, अन्य १२७.
--
ग्रामीण भागात ४४७ रुग्ण
बजाजनगर ७, वाळूज २, वडगाव कोल्हाटी १, कोकरी १, शेंद्रा एमआयडीसी १, चित्तेपिंपळगाव १, कन्नड १, सिल्लोड १, शेलगाव, ता.कन्नड १, फकीरवाडी लाडगाव १, माळीवाडा १, अब्दीमंडी १, कमलापूर, ता.गंगापूर १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, रांजणगाव फाटा १, साजापूर घाणेगाव १, रांजणगाव शेणपुंजी ४, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज २, पिसादेवी १, बाभूळगाव (बु.) १, चिंचोली लिंबाजी १, डोणगाव, ता.कन्नड २, विटा, ता.कन्नड २, धनगाव, ता.पैठण २, अन्य ४०८, तालुकानिहाय औरंगाबाद ४५, फुलंब्री ७, गंगापूर ११३, कन्नड ६७, खुलताबाद १०, सिल्लोड २१, वैजापूर ९०, पैठण ९०, सोयगाव ४ बाधित रुग्ण आढळून आले.
---
म्युकरमायकोसिससह विकृती असलेल्या बाधित महिलेचा मृत्यू
घाटीत २४ बाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३ जण नगर जिल्ह्यातील, तर दोन जालना जिल्ह्यातील असून, १९ मृत जिल्ह्यातील आहेत. यात ६० वर्षीय महिला वानेगाव यांचा कोरोनामुळे १४ मे पहाटे अडीच वाजता मृत्यू झाला. त्यांना रायनोऑरबायटल म्युकरमायकोसिस ही सहविकृती, तसेच सिव्हियर ॲक्युट रेस्परेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, बायलॅटरल न्यूमोनिया सोबत सायकोटाइन स्ट्राॅम त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
३३ बाधितांचा मृत्यू
घाटीतील मृतांत ६२ वर्षीय पुरुष भीमनगर, ५५ वर्षीय महिला नायगाव, ४९ वर्षीय महिला नीमखेड, ७० वर्षीय पुरुष अबरार काॅलनी, ५८ वर्षीय पुरुष सिडको महानगर, ५० वर्षीय पुरुष चित्रवाडी, ४३ वर्षीय महिला छत्रपतीनगर, ६१ वर्षीय पुरुष भावसिंगपुरा, २८ वर्षीय पुरुष खोकडपुरा, ६५ वर्षीय पुरुष गंगापूर, ६५ वर्षीय पुरुष शिऊर बंगला, ५५ वर्षीय महिला श्रीराम चाैक, ५५ वर्षीय महिला गंगापूर, ६४ वर्षीय महिला संघर्षनगर, ४७ वर्षीय पुरुष सिल्लोड, ६० वर्षीय पुरुष तालनेर, ७५ वर्षीय मुकुंदवाडी, ६८ वर्षीय महिला कोळीवाडा, तर ६० वर्षीय पुरुष शेवगाव, ७५ वर्षीय पुरुष राहुरी, २६ वर्षीय पुरुष गोनेगाव, नेवासा, जि. नगर, ७५ वर्षीय पुरुष पिंपळगाव, ५० वर्षीय महिला वडी बुद्रुक भोकरदन, जि. जालना यांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० वर्षीय महिला इशियाद काॅलनी, ८५ वर्षीय महिला पाथ्री, खासगी रुग्णालयात ७४ वर्षीय पुरुष नागसेन काॅलनी, ५९ वर्षीय महिला हिंदुस्थान आवास, ४९ वर्षीय महिला बांबू गल्ली, ५२ वर्षीय पुरुष मुंगसापूर, ३९ वर्षीय पुरुष देवगिरी कारखाना, ६८ वर्षीय पुरुष वैजापूर, ५१ वर्षीय पुरुष श्रीराम काॅलनी, ७८ वर्षीय महिला निंबायती, ३३ वर्षीय पुरुष पिंपळगाव, ३१ वर्षीय महिला विहामांडवा, ६४ वर्षीय पुरुष चिंचोली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.