२१ वर्षीय महिलेवर अत्याचार, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:17+5:302021-01-08T04:09:17+5:30
याप्रकरणी पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, वेरूळतांडा येथील गुलाब पुनमचंद चव्हाण याने ओळखीचा फायदा घेत माझ्याशी मैत्री वाढविली. आई ...

२१ वर्षीय महिलेवर अत्याचार, एकास अटक
याप्रकरणी पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, वेरूळतांडा येथील गुलाब पुनमचंद चव्हाण याने ओळखीचा फायदा घेत माझ्याशी मैत्री वाढविली. आई घरी नसताना घरात येऊन मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे सांगून माझ्या आईशीही याबाबत कल्पना देणार असल्याचे आश्वासन केले. व माझ्या इच्छेविरूद्ध बळजबरीने अत्याचार केला. कोणाला जर काही सांगितले तर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर आई घरी नसताना अनेक वेळा गुलाब चव्हाण याने लग्न करेल असे सांगून माझ्याशी शारीरिक संबध ठेवले. परंतु २८ डिसेंबर २०२० रोजी खुलताबाद येथे खासगी कामासाठी मी गेले असता गुलाब चव्हाण याने आपल्याला बाहेर जायचे आहे. असे म्हणत माझ्या दुचाकीवर बस. नाहीतर तुझी समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली. मी बदनामीच्या भीतीने दुचाकीवर बसले. त्याने म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेव्हा मी लग्नाबाबत विचारले असता तो नकार देऊ लागला. त्यामुळे लग्नाचे आमिष देत माझ्यावर सातत्याने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने खुलताबाद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे करीत आहे.