धरणांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

By Admin | Updated: July 10, 2017 00:05 IST2017-07-10T00:03:35+5:302017-07-10T00:05:47+5:30

परभणी : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिके अडचणीत सापडली आहेत़ तर दुसरीकडे ७ धरणांत केवळ २१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढू लागली आहे़

21 percent water stock in dams | धरणांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

धरणांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिके अडचणीत सापडली आहेत़ तर दुसरीकडे ७ धरणांत केवळ २१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढू लागली आहे़
परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मुख्य प्रकल्प असून, त्याचबरोबर गोदावरी नदीवरील ४ बंधारे आणि दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होतो़ दरवर्षी पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर यातील पाणी उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी वापरले जाते़ यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़ परंतु, पाऊस गायब झाल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे़ येलदरी धरणामध्ये केवळ ३ टक्के साठा झाला आहे तर निम्न दुधना प्रकल्पात ३९़८३ टक्के, झरी प्रकल्पामध्ये ३० टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात २४ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पात १६ टक्के साठा उपलब्ध आहे़ डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात केवळ ४़५ टक्के साठा उपलब्ध असून, पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यात तर पाणीच शिल्लक नाही़
यावर्षीच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन दिवस पाऊस झाला़ परंतु, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली आहे़ त्यामुळे धरणातील पाणी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे़ एकीकडे पावसाअभावी पिके धोक्यात आहेत तर दुसरीकडे धरणांमध्ये पाणीसाठा नसल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीच गंभीर होण्याची चिन्हे आहेत़

Web Title: 21 percent water stock in dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.