२१ लाख ३४ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:20 IST2017-08-10T00:20:47+5:302017-08-10T00:20:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : खाजगी कंपनीच्या लेखा विभागात काम करीत असताना विविध लोकांकडून प्राप्त रक्कम कंपनीच्या बँक खात्यात ...

 21 lakh 34 thousand cheating | २१ लाख ३४ हजारांची फसवणूक

२१ लाख ३४ हजारांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खाजगी कंपनीच्या लेखा विभागात काम करीत असताना विविध लोकांकडून प्राप्त रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता २१ लाख ३४ हजार ६७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गतवर्षी १ एप्रिल ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत हॉटेल अमरप्रीत येथे ही घटना घडली.
नानासाहेब पांडुरंग सातदिवे (रा.भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राजेंद्र बोरीकर हे अवतार मोटेल्स अ‍ॅण्ड सिने प्रा.लि. या खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीचे कार्यालय हॉटेल अमरप्रीत येथे आहे. तेथील अकाऊं ट विभागात १ एप्रिल ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत आरोपी कार्यरत होता.
या काळात कंपनीला प्राप्त झालेली २१ लाख ३४ हजार ६७ रुपये रकमेची नोंद त्याने संगणकात आणि कॅशबुकमध्ये घेतली. प्रत्यक्षात मात्र रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केलीच नसल्याचे आढळले. आरोपी हा कंपनीचा जुना कर्मचारी असल्याने त्याच्यावर अविश्वास न दाखविता कंपनीने त्यांच्या कार्यालयाचे सी.ए. कडून लेखापरीक्षण करून घेतले. लेखापरीक्षात आरोपीच्या कृत्याचा पर्दापाश झाला.
यामुळे कंपनीने याप्रकरणी त्याला अपहार केलेली रक्कम जमा करण्याची संधी दिली. ही संधी त्याने उधळून लावल्याने शेवटी कंपनीचे कर्मचारी राजेंद्र बोरीकर यांनी आरोपीविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक धर्मराज देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title:  21 lakh 34 thousand cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.