औरंगाबाद महामॅरेथॉनमधील २१ कि.मी. गटातील विजेत्यांना पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:56 IST2017-12-18T01:56:34+5:302017-12-18T01:56:53+5:30

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलामध्ये रविवारी (दि.१७) पहाटे पाच वाजेपासून खेळाडूंनी गर्दी केली होती. टीव्ही मालिका अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांची बक्षीस वितरण सोहळ्यातील उपस्थिती खेळाडूंचा उत्साह वाढविणारी ठरली.

 21 km of Aurangabad Mahamarethon Award distribution to the winners of the group | औरंगाबाद महामॅरेथॉनमधील २१ कि.मी. गटातील विजेत्यांना पारितोषिक वितरण

औरंगाबाद महामॅरेथॉनमधील २१ कि.मी. गटातील विजेत्यांना पारितोषिक वितरण

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलामध्ये रविवारी (दि.१७) पहाटे पाच वाजेपासून खेळाडूंनी गर्दी केली होती. टीव्ही मालिका अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांची बक्षीस वितरण सोहळ्यातील उपस्थिती खेळाडूंचा उत्साह वाढविणारी ठरली. खेळाडूंची जिद्द आणि मेहनतीचे त्यांनी कौतुक केले. २१ आणि १० कि. मी. गटातील विविध विजेत्यांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी बक्षीस देण्यात आले.

Web Title:  21 km of Aurangabad Mahamarethon Award distribution to the winners of the group