वाळू चोरी प्रकरणी २१ गुन्हे दाखल
By Admin | Updated: April 9, 2017 23:29 IST2017-04-09T23:26:30+5:302017-04-09T23:29:25+5:30
परतूर : परतूर तालुक्यात वाळू मफिया विरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे

वाळू चोरी प्रकरणी २१ गुन्हे दाखल
परतूर : परतूर तालुक्यात वाळू मफिया विरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर डोल्हारा पात्रातील वाळू चोरी थांबवण्यात महसूल व पोलिस प्रशासनाला यश आले आहे.
परतूर तालुक्यातील गोदावरी व दुधना नदीच्या काही वाळू पट्टयातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सतत सुरू असते. यातच डोल्हारा वाळू पट्टा चांगलाच गाजला आहे. वाळू माफिया व गावकरी यांच्यातही या वाळू चोरी प्रकरणी संघर्ष पेटला होता . या वाळू तस्करी प्रकरणी गावातील काही मंडळी व ग्राम पंचायतीचे पदाधिकारी यात गुंतले होते. यामुळे महसूल व पोलिस यांनी मोहीम उघडून वाळू माफियांचे वाळू साठे जप्त करू न दंड आकारला.
ज्या शेतातून वाळू मफियांनी वाटा केल्या होत्या त्या वाटात जेसीबीने खड्डे खोदण्यात आले आहेत. परतूर व वाटूर मंडळा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर कावजवळा सजाचे तलाठी बाळापूरे यांच्या निलंबनाचा व विभागीय चौकशीचा प्रस्तावही
वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
या माफियांविरूध्द आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्याबरोबरच २ लाख ३४ हजार ५८२ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाळू लिलावातून १ लाख ४३ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने एका पथकाची स्थापना केली आहे.
एकूणच महसूल व पोलिस विभागाने वाळू माफियांचे पाश आवळले असून, ही कारवाई आणखी तीव्र होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)