२०६० उमेदवार पात्र
By Admin | Updated: June 28, 2014 01:14 IST2014-06-27T23:53:29+5:302014-06-28T01:14:38+5:30
परभणी: जिल्हा पोलिस दलात १४४ पदांसाठी होत असलेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी २ हजार ६० उमेदवार पात्र ठरले आहेत.

२०६० उमेदवार पात्र
परभणी: जिल्हा पोलिस दलात १४४ पदांसाठी होत असलेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी २ हजार ६० उमेदवार पात्र ठरले आहेत.
येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ६ जूनपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. कागदपत्र तपासणी, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यात ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले असून भरती प्रक्रियेतील अखेरचा टप्पा २९ जून रोजी आहे.
१४४ पदांसाठी प्रशासनाला ६ हजार ४०२ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी छाती, उंची मोजमाप आणि गैरहजर असे २ हजार ४३० उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. ३ हजार ९७२ उमदेवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरले होते. या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडल्यानंतर २ हजार ६० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
२९ जून रोजी सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत लेखी परीक्षा होणार आहे. १० ते १२ हा वेळ पूर्वतयारीसाठी असून १२ वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे.
१०० गुणांच्या या परीक्षेसाठी दीड तासांचा वेळ दिला जाणार आहे.
अशी आहे कस्ट आॅफ लिस्ट
या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेसाठी कट आॅफ लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानुसार खुल्या पुरुष गटात ७५ गुण, महिला गटात ५०, खेळाडूसाठी ५०, प्रकल्पग्रस्त ७५, माजी सैनिक ५५, भूकंपग्रस्त ६५, होमगार्ड ५४, अंशकालीन ५०, इतर मागासवर्गीय ५६, अनुसूचित जमाती ५०, विशेष मागासवर्ग ६० गुण असून याप्रमाणे उमेदवार लेरी परीक्षेसाठी पात्र राहणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
१४४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यापैकी १०० जागा आरक्षणाप्रमाणे पुरुषांसाठी असून ४४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या १४४ जागांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी २ हजार ६० उमेदवार पात्र झाले असून या उमेदवारांमधून १४४ उमेदवार निवडले जाणार आहेत.लेखी परीक्षा कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत होणार असून पोलिस प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
लेखी परीक्षा झाल्यानंतर ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रॅन्डमली काही उत्तरपत्रिकांची मॅन्युअली तपासणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलिस मुख्यालय तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयात लावली आहे.