जिल्हा कुस्ती स्पर्धेत २०० मल्लांचा सहभाग

By Admin | Updated: November 17, 2015 00:29 IST2015-11-16T23:58:37+5:302015-11-17T00:29:58+5:30

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख व शहीद जवानांच्या स्मरणार्थ लातूर जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कुस्ती स्पर्धा शिवणी खुर्द येथे घेण्यात आल्या़

200 wrestlers participate in district wrestling competition | जिल्हा कुस्ती स्पर्धेत २०० मल्लांचा सहभाग

जिल्हा कुस्ती स्पर्धेत २०० मल्लांचा सहभाग

 

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख व शहीद जवानांच्या स्मरणार्थ लातूर जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कुस्ती स्पर्धा शिवणी खुर्द येथे घेण्यात आल्या़ यात जिल्ह्यातील २०० मल्लांनी सहभाग नोंदविला असून, महिला गटातही कुस्ती स्पर्धकांनी हजेरी लावली होती़
स्पर्धेचे उद्घाटन लातूर ग्रामीणचे आ़ त्र्यंबक भिसे, माजी आ़ वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब पाटील, बाबू शेख, दगडू पडिले, रविशंकर जाधव, युवराज जाधव, सरपंच भागिरथीबाई बरुरे, फरमान शेख यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक मुख्य संयोजक शब्बीर पहेलवान यांनी केले़ सूत्रसंचालन महादेव मेहकरे, अब्दुल गालिब शेख यांनी केले़ या स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी लातूर जिल्ह्यातून शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर गोचडे व सागर बिरादार यांची निवड करण्यात आली आहे़ स्पर्धेतील विजेते खेळाडू, बाल विभाग - ऋषिकेश जाधव, विशाल सातपुते, प्रदीप गोरे, आकाश सावरगावे़ कुमार विभागात - विनोद कामाळे, प्रसाद शिंदे, महेश तातपुरे, पवन गोरे, राम पुजारी, फिरोज शेख, धनराज पालकर, महादेव काळे, हेमचंद्र सांडूऱ
माती विभाग (खुला गट) - पंकज पवार, सुशांत मुक्तापूरे, विष्णू भोसले, शशिकांत कांबळे, महादेव ससाने, दीपक कराड, रामलिंग नारंगवाडे़ गादी विभाग - शरद पवार, दत्ता भोसले, देवानंद पवार, वैजनाथ पाटील, चंद्रशेखर पाटील, भरत कराड, शैलेश शेळके़ पंच म्हणून रावसाहेब मुळे, प्रा़ अशिष क्षीरसागर, बालासाहेब शेप, एल़पी़ बिराजदार, रंगनाथ अंबुलगे, अण्णासाहेब मुळे, रोहिदास माने, शिवरुद्र पाटील व बळी बिराजदार यांनी काम पाहिले़
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सिताराम जाधव, पंढरीनाथ गुणाले, किशन गिरी, अनिल बरुरे, चाँदपाशा सय्यद, कृष्णदेव जाधव, मुसा सय्यद, भिमराव जाधव, जालिम सय्यद, इसाक शेख, जाकर सय्यद, माधव लातूरे, विशाल पाटील, मुसा सय्यद यांनी परिश्रम घेतले़ (क्रीडा प्रतिनिधी)
या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला होता़ यात आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू शैलेश शेळके, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शरद पवार, ज्ञानेश्वर गोचडे यांच्यासह राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेता व रुस्तुमे-ए-हिंद कै़ हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागर बिराजदार तसेच जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती़

Web Title: 200 wrestlers participate in district wrestling competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.