शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

बिडकीनसह पाच गावांतील २०० प्रस्ताव रखडले

By admin | Updated: December 30, 2015 00:44 IST

औरंगाबाद : डीएमआयसीसाठी बिडकीनसह पाच गावांतील प्रतिबंधित क्षेत्रातील जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सुमारे

औरंगाबाद : डीएमआयसीसाठी बिडकीनसह पाच गावांतील प्रतिबंधित क्षेत्रातील जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सुमारे २०० प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत; परंतु त्या प्रस्तावात त्रुटी काढण्यात आल्याने हे प्रस्ताव रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डीएमआयसीसाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीमध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. डीएमआयसीच्या शेंद्रा-बिडकीन मेगापार्कसाठी बिडकीनसह पाच गावांची २३५१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यापैकी ३४६ शेतकऱ्यांकडे ५१२ हेक्टर जमीन सरकारने कसण्यासाठी दिली होती. या जमिनीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता परस्पर खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंद सातबारा आणि फेरफार उताऱ्यावर घेण्यात आली. या सरकारी जमिनींच्या सातबारा आणि फेरफार उताऱ्यावर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा शिक्का मारण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात अडचणी येत आहेत. या जमिनी नियमित करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याचा जमीन नियमित करण्याचा प्रस्ताव तयार करून सुमारे २०० प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. या प्रस्तावांची जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी हे छाननी करीत असून या प्रस्तावांमध्ये त्रुटी काढण्यात आल्याने हे प्रस्ताव रखडल्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यात अडचणी येत आहेत.