शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:19 IST

मनपा, पोलिस उद्या पूर्ण ताकदीने उतरणार; विरोध केल्यास फौजदारी; २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ८ चमू, १५ टिप्पर, ५०० पोलिस सज्ज

छत्रपती संभाजीनगर : खंडपीठाने मंगळवारी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर महापालिका आणि पोलिस जालना रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी गुरुवारी (दि. २६) पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. ६० मीटरच्या आत येणारी सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले. २०० कर्मचारी, वाॅर्ड अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ८ चमू, २० जेसीबी, ५ पोकलेन, १५ टिप्पर तैनात करण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५०० पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा महापालिकेच्या मदतीला राहणार आहे.

महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खंडपीठाने ६० मीटर म्हणजेच १९६ फुटांच्या आत येणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मुभा दिली. दुभाजकापासून ३० मीटर उजवीकडे आणि ३० मीटर डावीकडे टेप लावून कारवाई सुरू केली जाणार आहे. सकाळी ९:३० ते १० पर्यंत कारवाईला सुरुवात होईल. मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमण हटाव पथक पुढे जाईल. एकूण ८ टीम तैनात केल्या जातील. प्रत्येक टीमचे नेतृत्व वेगवेगळे वाॅर्ड अधिकारी करतील. प्रत्येक टीममध्ये एक इमारत निरीक्षक आणि बाकीचे कर्मचारी राहतील. जवळपास २०० मनपा कर्मचारी मोहिमेत सहभागी होतील.

विरोध केल्यास फौजदारीअतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्हे दाखल केल्याचा तपशील खंडपीठाला सादर केला जाईल. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना भविष्यात मनपा निवडणूक लढविणे अवघड होणार असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका