२० गावे रस्त्याच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 9, 2014 00:39 IST2014-08-09T00:20:59+5:302014-08-09T00:39:21+5:30

हदगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, परंतु हदगाव तालुक्यातील २० गावे अद्यापही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत़

20 villages waiting for the road | २० गावे रस्त्याच्या प्रतीक्षेत

२० गावे रस्त्याच्या प्रतीक्षेत



हदगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, परंतु हदगाव तालुक्यातील २० गावे अद्यापही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत़
गावाचा विकास करण्यासाठी दळणवळण मार्ग महत्त्वाचा दुवा आहे़ विज्ञानामुळे संपूर्ण मानव जिवन बदलले आहे खरे, परंतु या गावांना ६७ वर्षापासून पक्का रस्ताच मिळाला नसल्याने विकासाचे देणे-घेणे या गावांना नाही़ यामधये गायतोंड, पळसवाडी, जगापूर, सावदगाव-डोंगरकडा, बरडशेवाळा-पांगरी, मार्लेगाव-कोळी, रावणगाव-कृष्णापूर, जांभळा-रावणगाव, नाव्हा-तामसा, राळावाडी, भाटेगाव-उमरी, मरडगा आदी गावांचा समावेश आहे़
ही गावे २ ते ६ हजार लोकसंख्या असलेली गावे आहेत़ सर्कलच्या गावापासून २ ते ६-१० कि़मी़ अंतरावरील गावे आहेत़ २ किंवा ३ कि़मी़ लांबीचा पक्का रस्ता मिळण्यासाठी ६७ वर्षे वाट पहावी लागते़ हीच तालुक्यातील लोकप्रतिनिधीची शोकांतिका आहे़ लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले़ त्यामुळे त्यांच्याकडे स्वत:ची दुचाकी, चारचाकी वाहने आली़ परंतु या गावातील लोक आदिवासी वा बहुजन असल्यामुळे त्यांचा आवाज लोकप्रतिनिधींच्या कानावरूनच जातो़ त्यांचा आवाज कोण्याही नेत्याच्या हृदयाला साद घालत नाही़ ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे आक्रमक कार्यकर्ते वा सोयरेधायरे आहेत, त्या ठिकाणी आवश्यकता दुबार-तिबार रस्त्याचे काम मंजूर होते़ परंतु या गावांना एकदाही रस्ता झालाच नाही़ त्या गावांना प्राधान्य द्यावे असे कोणत्याही कार्यकर्त्याला वाटत नाही़
बी-बियाणे, खत-औषधी दोन महिन्यापूर्वीच न्यावी लागते़ कारण पैसे मोजूनही रस्त्यामुळे वाहन यायला तयार नसतात़ अनेक गावांत १ कि़मी़ काम झाले़ परंतु पुढील काम मंजूर होईपर्यंत या कामाची वाट लागली़ रस्त्यामुळे अनेक मुलामुलींचे शिक्षण अर्धवट राहिले़ पूर्वी नोकरीची संधी तरुणांच्या हुकल्या़ अनेक संस्था शहरात वेगवेगळे उपक्रम राबवून शहराच्या विकासाला हातभार लावतात़ मग या खेड्यांना दत्तक घेवून त्याचा विकास करण्याचा पायंडा कोणी पाडत नाही़ रस्ता झाला तर अनेक सुखसोयींचा फायदा या खेडूतांना होईल़ (वार्ताहर)


रस्ता नसल्यामुळे अनेकांना सर्पदंश, साथरोग, बाळंतपण यासाठी वाहनांची सोय न होवून उपचाराला विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ अशा अनेक घटना प्रत्येक गावात घडल्या़ शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातून घरी वा बाजारात विक्रीला नेण्यासाठी अनेक अडचणी येतात़ यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बैलांना दुखापत होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले़

Web Title: 20 villages waiting for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.