टीईटीसाठी २० हजार परीक्षार्थी
By Admin | Updated: December 13, 2014 23:57 IST2014-12-13T23:57:14+5:302014-12-13T23:57:14+5:30
लातूर : शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी )२० हजार ६५४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़

टीईटीसाठी २० हजार परीक्षार्थी
लातूर : शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी )२० हजार ६५४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ यातील सर्व विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत़ याची दोन सत्रात परिक्षा घेतली जाणार आहे़
शिक्षक पात्रता परिक्षा ही दोन सत्रात घेतली जाणार आहे़ या मध्ये पहिल्या सत्रात पेपर १ साठी रविवारी सकाळी १०़ ३० ते १ वेळेत शहरातील ३७ केंद्रावर परिक्षा घेतली जाणार आहे़ पेपर १ साठी १३हजार १८२ विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत़ दुसऱ्या सत्रात पेपर २ हा दुपारी २़३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे़ या पेपर २ साठी ७ हजार ४७२ विद्यार्थी परिक्षेस पात्र ठरले असून २१ परिक्षा केद्रावर ही परिक्षा घेतली जाणार आहे़ शिक्षक पात्रता परिक्षा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हाअधिकारी पांडूरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रन समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह ८ सदस्यांची समिती बणवण्यात आली आहे़ समितीचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकरीअधिकारी दिनकर जगदाळे आहेत़ सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड आहेत़ सदस्यम्हणून पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हान, निरंतर शिक्षणचे शिक्षण अधिकारी सेलूकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी गणपत मोरे, डायेटचे प्राचार्य धुमाळ, महापलिकेचे शिक्षण अधिकारी डी़ एच़ सोनफुले यांची ही समिती बनवण्यात आली आहे़ या परिक्षेच्या नियोजनासाठी ९ झोनल अधिकारी , ५८ के्रद्र संचालक ११८ परिवेक्षक , ५३० समवेक्षक , ७४ लिपिक ,१४८ सेवक असा ९३७ कर्माचाऱ्यांचा ताफा रविवार सकाळी ७ वाजल्या पासून कामाला सरुवात करण्यात येणार आहे़(प्रतिनिधी)