२० लाख रोपे उपलब्ध
By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-30T23:54:01+5:302014-08-31T00:14:55+5:30
रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत.

२० लाख रोपे उपलब्ध
रामेश्वर काकडे, नांदेड
नांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत. मात्र मागच्या आठवड्यापर्यंत केवळ २९ हजार ४६४ रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत कृषी विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण तसेच जिल्हा परिषदेमार्फत मोठ्या संख्येने रोपट्यांची लागवड करुन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हातभार लावण्यात येत आहे. आजपर्यंत विविध विभागामार्फत १७ लाख ९७६८२ खड्डे खोदण्यात आले आहेत. जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाला ४ लाख ११३५८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मागच्या आठवड्यापर्यंत १ लाख ४०२६७ खड्डे खोदले असून २७६२१ वृक्षांची लागवड केलेली आहे. वनविभागाला ११ लाख ८१३३७ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून १२ लाख ३३००२ खड्डे तयार आहेत. तर जिल्हा परिषदेला १० लाख ७८३९२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून १ लाख २४४०७ खड्डे खोदण्यात आले आहेत. तसेच सामाजिक वनीकरण विभागाला २ लाख ७५०० लागवडीचा लक्षांक दिला असून १ लाख ८२३०० खड्डे खोदण्यात आले आहेत.
असे जिल्ह्याला एकूण २८ लाख ७८३९२ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून १७ लाख ९७६८२ खड्डे खोदून तयार आहेत. तर २२ रोपवाटिकेमध्ये २० लाख ९१७९४ रोपे तयार करण्यात आली आहेत. परंतु लागवड मात्र केवळ २९४६४ एवढी झाली आहे.
तालुकानिहाय दिलेले उद्दिष्ट असे- अर्धापूर- ८२०५०, खोदलेले खड्डे ७३८४०,भोकर- उद्दिष्ट ३ लाख ८८२१४, खड्डे ३ लाख १३४५१, बिलोली- उदिष्ट १ लाख २६४००, खड्डे ४०७५०, देगलूर- ६२२००, खड्डे २८८४०, धर्माबाद- २ लाख २००, खड्डे ३७६२०, हदगाव- उद्दिष्ट ४ लाख ७८०५७, खड्डे ३ लाख ३९६, हिमायतनगर- उद्दिष्ट ४५७००, खड्डे ३१६३५, कंधार- उद्दिष्ट १ लाख २७०६०, खड्डे १ लाख ५३६७, किनवट- उद्दिष्ट ६ लाख २१७७२, खड्डे ५ लाख ५१२५२, लोहा- उद्दिष्ट ७६५००, खड्डे ४२७००, माहूर- उद्दिष्ट २ लाख ६६ हजार , खड्डे ८६३११, मुदखेड- उद्दिष्ट १ लाख २५६०, खड्डे २०२४७, नांदेड- उद्दिष्ट १ लाख ७७७९०, खड्डे ७२७९१, उमरी- उद्दिष्ट ८२२७४, खड्डे ६२१५०, याप्रमाणे जिल्ह्यातील वृक्षलागवडीच्या लक्षांकाची स्थिती आहे.
यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले तर पर्यावरणसंवर्धन करण्यासाठी मदत होणार आहे.
यंदा पावसाळा संपत आला तरी आजपर्यंत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. याचा परिणाम पावसाअभावी वृक्षलागवडीवर झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत केवळ २९ हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्याला २९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी पावसाअभावी यावर्षी शतकोटी वृक्षलागवड योजना फेल होणार असल्याची स्थिती सध्यातरी दिसत आहे.
सध्या गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट कितपत साध्य होणार हे सांगणे आजघडीला तरी अशक्य आहे.