बँकेत २० लाखांचा अपहार

By Admin | Updated: August 19, 2014 02:07 IST2014-08-19T01:21:45+5:302014-08-19T02:07:47+5:30

हिंगोली : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेत २० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

20 lakhs in cash | बँकेत २० लाखांचा अपहार

बँकेत २० लाखांचा अपहार




हिंगोली : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेत २० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत परभणी जिल्हा सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी रमेश जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी नथू शंकर भाकरे (रा. चोंढी बु. ता. सेनगाव) याच्याविरुद्ध फसवणुकीचा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. १४ आॅगस्ट २००८ ते २१ जानेवारी २०११ या कालावधीत जिल्हा बँकेच्या बाळापूर शाखेमध्ये नथू भाकरे या कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून २० लाख ४ हजार २६९ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सपोनि पंडित कच्छवे करीत आहेत. (प्रतिनिधी)



हिंगोली/वसमत : दोघांना रस्त्यात अडवून जांबियाचा धाक दाखवत दुचाकी जाळण्यात आल्याची घटना १७ आॅगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वसमत शहरात घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत शहरातील मो. मतीन मो. मोईन (वय १९, रा. कुरेशी मोहल्ला) हा मित्रासोबत दुचाकी क्र. एम.एच. २६- ए.बी. ३२११ वरुन बर्फ आणण्यासाठी गेले होते; परंतु बर्फ न मिळाल्याने परत येत असताना कबुतरखाना गल्लीत शेख महेमुद शेख महेबुब याने त्या दोघांना रस्त्यात अडविले. हातातील जांबियाचा धाक दाखवून दुचाकी हिसकावून घेत त्याने सदरील वाहन जाळून टाकले, अशी फिर्याद मो. मतीन याने पोलिसांत दिली. त्यावरुन आरोपी शेख महेमुद याच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार पटेल करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 20 lakhs in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.