२० जोडप्यांच्या तक्रारी!
By Admin | Updated: December 21, 2014 00:06 IST2014-12-20T23:43:43+5:302014-12-21T00:06:23+5:30
गजानन वानखडे , जालना महिला तक्रार निवारण कक्षाला दोन महिन्यात २० जोडप्यांनी मोबाईल, व्हॉट्सअॅपवरील संशयित चित्रीफिती वरून एकमेकांवर संशय घेवून

२० जोडप्यांच्या तक्रारी!
गजानन वानखडे , जालना
महिला तक्रार निवारण कक्षाला दोन महिन्यात २० जोडप्यांनी मोबाईल, व्हॉट्सअॅपवरील संशयित चित्रीफिती वरून एकमेकांवर संशय घेवून टोकाचे पाऊल उचल्याने मोबाईल हे एक संशय किलरची भूमिका बजावत आहे.
पूर्वी हुंड्यासाठी, मारहाण केल्याप्रकरणी, सासूच्या त्रासाला कंटाळून अनेक विवाहिता नांदावयास जात नसत. परंतु आधुनिकतेचा तोरा मिरवणाऱ्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर २०१४ या दोनच महिन्यात मोबाईलवरून बोलण्याच्या संशयावरून, काही चित्रावरून पती-पत्नी दोघांनीही एकमेकांवर तक्रारी करण्यात आल्या. असे २० प्रकरण महिला तक्रार निवारण कक्षात आले आहे. कौटुंबिक प्रकरणांपेक्षा या हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने फक्त संशयावरून कुंटुब विभक्त होवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे जाधव म्हणाल्या.
गेल्या आठ वर्षात महिला तक्रार निवारणामुळे ५९०६ एवढ्या तक्ररी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३५५६ प्रकरणात महिला निवारण कक्षाने तडजोड करण्यात महिला कक्षाला यश आले आहे. त्यात अनेक कुटुंबे गुण्यागोविंदाने संसार करत असल्याचे आशादायी चित्र आहे. आधुनिक जमान्यात सर्वाकडे मोबाईल आला खरा परंतु अनेकांनी याचा दुरोपयोग सुरू केल्याने अनेक सुखी संसारात मोबाईलवरून बोलण्यावरून अनेकांनी आपला संसारात समस्या वाढत असल्याचे विदारक चित्र आहे. यातूनच अनेक तक्रारी वाढत असल्याचे कक्षातून सांगण्यात आले. कुटुंब विभक्त होण्याच्या मार्गावर कौटुंबिक प्रकरणात महिला तक्रार निवारण कक्षाकडे मोबाईलवरून बोलण्याचा संशय आणि व्हाटसअॅपवरील संशयित चित्र्फितीमुळे दोघा नवरा बायकोत वाद झाल्याचे २० प्रकरणे महिला कक्षाकडे न्याय निवाड्यासाठी आले आहे. परंतु दोघांच्याही एकमेकाविरूध्द गंभीर तक्रारी असल्याने हे प्रकरण अतिशय गुंतागुतीचे असल्याने आम्ही त्यामुळे आम्ही पती पत्नीला समुपदेशाने हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना जाधव याांनी सांगितले.
पुन्हा नव्याने संसार थाटण्यासाठी त्यांचे समोपदेशन करणे फार जरूरीचे आहे. कारण अनेक दापत्यांनी संशयाचे पुरावे म्हणून रेकॉर्डच आपल्या सोबत आणल्याने दिवसेंदिवस मोबाईलही संसार मोडण्यास कारणीभूत होत असल्याचे म्हणणे आहे.