विनयभंगप्रकरणी २ वर्षे सक्त मजुरी
By Admin | Updated: July 22, 2014 00:37 IST2014-07-22T00:29:47+5:302014-07-22T00:37:27+5:30
औरंगाबाद : विवाहितेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. निवारे यांनी आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड ठोठावला.

विनयभंगप्रकरणी २ वर्षे सक्त मजुरी
औरंगाबाद : विवाहितेच्या घरात बळजबरीने घुसून तिचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. निवारे यांनी आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड ठोठावला.
फिर्यादी महिला इंदिरानगर येथे पतीसह भाड्याच्या घरात राहते. ११ मार्च २०१३ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती घरात एकटी असताना आरोपी बाबासाहेब ऊर्फ तात्याराव अशोक खरात (३०, रा. इंदिरानगर) मोटारसायकलवर तिच्या घरी आला. आरोपी जबरदस्तीने घरात घुसला व तिचा विनयभंग करीत पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन गेला. महिलेने खरातविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.बी. निवारे यांच्यासमोर सुनावणी झाली. करुणा गरूड यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने आरोपीला कलम ४५२ नुसार १ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, तसेच १ वर्षे सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड ठोठावला. या खटल्यासाठी पैरवी अधिकारी म्हणून नजीर खान बद्रुद्दीन खान यांनी सहकार्य केले.
दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रक्कमेपैकी २ हजार रुपये फिर्यादी महिलेस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.