२ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त

By Admin | Updated: July 5, 2014 00:43 IST2014-07-04T23:47:40+5:302014-07-05T00:43:50+5:30

सेनगाव : तालुक्यातील रेती घाटावरून नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत

2 thousand 500 brass sandstone seized | २ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त

२ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त

सेनगाव : तालुक्यातील रेती घाटावरून नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असून या विरोधात मोठ्या तक्रारी वाढल्याने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने पूर्णा नदीवरील रेतीघाटाची तपासणी केली. या तपासणी दरम्यान वझर येथील रेतीघाटावर २ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त केला.
तालुक्यातील पूर्णा नदीवरील बन, वझर या संयुक्त रेतीघाटावर नियमांचा बोजवारा उडविला जात असून यंत्राच्या सहाय्याने बेसुमार वाळूसाठा उपसा होत असल्याच्या तक्रारी परिसरातील ग्रामस्थांकडून होत असल्याने यासंबंधी ४ जुलैला जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी के. ए. तडवी, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, मंडळ अधिकारी बोथीकर, घुगे आदींच्या पथकाने दोन्ही रेती स्थळाना अचानक भेट देवून पाहणी केली. या तपासणी दरम्यान वझर रेती घाटावरील २ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून इतर नियमांच्या वाळू दोन्ही रेती घाटावर तपासण्यात आल्या असल्याची माहिती सारंग चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)
हिंगोलीत तीन टिप्पर पकडले
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील रूपूर येथील नदीपात्रातून वाळूउपसा करून गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करताना तीन टिप्पर पकडले आहेत. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने सावरखेडा शिवारात ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता ही कारवाई केली. गौण खनिजाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार कडवकर यांनी मंडळ अधिकारी खंदारे, बेले, देवधरे, तलाठी बाबर यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी सावरखेडा शिवारात कारवाई केली. या कारवाईत तीन टिप्पर जप्त करून शहर पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. तसेच वाहनासोबतच्या मजुरांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: 2 thousand 500 brass sandstone seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.